नाशिक : राज्याचे रेशीम विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्तपणे २० नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान २०२४ राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद नाशिक कृषी विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातून एकूण ४२३ शेतक-यांची निवड रेशीम विभागामार्फत करण्यात आली होती.
या निवड झालेल्या व इच्छुक शेतकऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा जिल्हा परिषदेत झाली. (Mulberry cultivation silk farming will get encouragement from MGNREGA Farmers workshop in Zilla Parishad nashik)
विविध तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात ४१ शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेत नाशिक जिल्ह्यातून यापूर्वी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभवावर सविस्तर चर्चा झाली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी या कार्यशाळेत सर्व शेतक-यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यशाळेत शेतक-यांसोबत संवाद साधून येणा-या अडचणीबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले.
नरेगा योजनेतून तुती लागवड व रेशीम शेतीस प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी विस्तार अधिकारी (कृषी) यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष देवून रेशीम उद्योगाबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचविण्यासाठी प्रयत्न करणेबाबत सूचना दिल्या.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) माधुरी गायकवाड व जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषी) यांनी प्रयत्न केले.
४०० शेतकऱ्यांची निवड होणार
नव्या शासन निर्णयानुसार एकूण १८१ शेतकऱ्यांची कृषी विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
गटस्तरावर शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती उद्योगाचे प्रशिक्षण होत असून आजतागायत १३२२ शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड ही ग्रामसभेतून करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कृषी अधिकारी यांना भेटावे अशी माहिती कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.