Patients who came for treatment at Multanpura Hospital esakal
नाशिक

Multanpura Hospital : मुलतानपुरा रुग्णालय रुग्णांसाठी खुले

सकाळ वृत्तसेवा

Multanpura Hospital : मुलतानपुरा येथील रुग्णालयास अखेर मुहूर्त सापडला. उद्‌घाटन झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झाले. तीन दिवसात सुमारे ३० रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला.

अनेक वर्षांच्या मागणीनंतर रुग्णालय सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच पूर्ण क्षमेतेने रुग्णालय सुरवात करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. (Multanpura Hospital open for patients Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मुलतानपुरा रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तीन दिवसात सुमारे ३० रुग्णांनी उपचार घेतले. सर्दी, खोकला, ताप असे प्राथमिक उपचार सध्या या ठिकाणी केले जात आहे. त्याचबरोबर एक्स-रे आणि रक्त, लघवी तपासणी नमुने कलेक्शन सेंटर कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेची वैद्यकीय विभागात भरती होणार आहे. त्यात मुलतानपुरा रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या डॉक्टर, कर्मचारी यांचीही भरती होणार आहे. त्यानंतर रुग्णालय पुरेसा कर्मचारी वर्ग मिळताच सर्व प्रकारचे आजारांवर उपचार करण्यात येऊन प्रसूती विभागदेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे गरोदर मातांची तपासणी आणि लसीकरणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश गरुड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

Latest Marathi News Updates live : राहुल गांधींची थोड्याच वेळात सभा

'सिंघम अगेन'मध्ये झळकतायत एक दोन नाही तर तीन मराठी कलाकार; एकाला तर दीपिकाने ऑनस्क्रीन धुतलाय

IPL Mega Auction 2025 : लिलावात Unsold राहण्याची भीती; पृथ्वी शॉ अन् सर्फराज खान यांनी घेतला मोठा निर्णय, सर्वांना वाटले आश्चर्य

SCROLL FOR NEXT