Exciting moments from the Taekwondo and Basketball match of the State Police Sports Tournament going on at the Maharashtra Police Academy ground. esakal
नाशिक

Police Sports Competition: सर्वसाधारण जेतेपदासाठी मुंबई शहर, प्रशिक्षण संचालनालयात चुरस! क्रीडा स्पर्धांचा उद्या होणार समारोप

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या असून, स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदासाठी मुंबई शहर आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात चुरस रंगली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथे सुरू असलेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या असून, स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदासाठी मुंबई शहर आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात चुरस रंगली आहे.

पदतालिकेमध्ये पुरुषांमध्ये ३७ पदके पटकावत मुंबई शहर तर महिलांमध्ये प्रशिक्षण संचालनालय २२ पदकांसह अव्वलस्थानी आहे. तर, कुस्तीचे सांघिक विजेतेपदाचा खशाबा जाधव कप प्रशिक्षण संचालनालयाने तर, महिलांचे विजेतेपद मुंबई शहराने पटकावला आहे. दरम्यान, स्पर्धेचा शनिवारी (ता. १०) समारोप होत आहे. (Mumbai city for general title training directorate Police Sports Competition will conclude tomorrow nashik news)

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानांवर ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. गेल्या रविवारपासून (ता.४) या स्पर्धांना सुरूवात झाली. सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे झुकल्या आहेत.

या स्पर्धांमध्ये सांघिक आणि वैयक्तिक गटांमध्ये प्रशिक्षण संचालनालय आणि मुंबई शहराच्या संघांनी चमकदार कामगिरी नोंदवून पदकांची लयलुट केली आहे. त्यामुळे याच दोन्ही संघांमध्ये सर्वसाधारण विजेतेपदासाठी चुरस दिसून येत आहे.

* सांघिक स्पर्धांचा निकाल :

कुस्ती (पुरुष) चॅम्पियनशिप :

- खशाबा जाधव चॅम्पियनशिप - प्रशिक्षण संचालनालय (प्रथम), एसआरपीएफ (द्वितीय), मुंबई शहर (तृतीय).

- उत्कृष्ठ कुस्तीपटू : अमीर अब्दुल (प्रशिक्षण संचालनालय)

कुस्ती (महिला) चॅम्पियनशिप :

- मुंबई शहर (प्रथम), प्रशिक्षण संचालनालय (द्वितीय), कोल्हापूर परिक्षेत्र (तृतीय)

- उत्कृष्ठ कुस्तीपटू : संगीता टेकाम (प्रशिक्षण संचालनालय)

विजयी संघ (पुरुष) :

हॉकी : कोल्हापूर परिक्षेत्र, प्रशिक्षण संचालनालय, पुणे शहर-पिंपरी चिंचवड, एआरपीएफ परिक्षेत्रे

फुटबॉल : एसआरपीएफ, प्रशिक्षण संचालनालय

कबड्डी : पुणे शहर-पिंपरी चिंचवड, मुंबई शहर, एसआरपीएफ, नवी मुंबई-मीरा भाईंदर-कोकण परिक्षेत्र

हॅण्डबॉल : पुणे शहर-पिंपरी चिंचवड, मुंबई शहर

व्हॉलीबॉल : प्रशिक्षण संचालनालय, कोल्हापूर परिक्षेत्र, पुणे शहर-पिंपरी चिंचवड, एसआरपीएफ

बास्केटबॉल : नाशिक परिक्षेत्र, मुंबई शहर, एसआरपीएफ, कोल्हापूर परिक्षेत्र

खो-खो : प्रशिक्षण संचालनालय, मुंबई शहर

विजयी संघ (महिला)

कबड्डी : पुणे शहर-पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, मुंबई शहर, नागपूर परिक्षेत्र

व्हॉलीबॉल : नागपूर शहर, प्रशिक्षण संचालनालय, कोल्हापूर परिक्षेत्र, अमरावती परिक्षेत्र.

बास्केटबॉल : नागपूर परिक्षेत्र, प्रशिक्षण संचालनालय, अमरावती परिक्षेत्र, नागपूर शहर

खो-खो : मुंबई शहर, प्रशिक्षण संचालनालय

* वैयक्तिक स्पर्धांचा निकाल :

ॲथेलेटिक्स (पुरुष)

- १५०० मी.धावणे : प्रथम - साईनाथ मोरे (प्र.सं.), द्वितीय - वैभव नार्वेकर (कोकण परिक्षेत्र), तृतीय - लिलाधर खरबनकर (प्र.सं),

- ४०० मी. धावणे : प्रथम - गोविंद कोळेकर (प्र.सं.), द्वितीय - अजय जाधव (एसआरपीएफ), तृतीय - सुनिल भोसले (एसआरपीएफ)

- ४०० मी. अडथळा धावणे : प्रथम - अमृत तिवले (कोल्हापूर परिक्षेत्र), द्वितीय - करण पाटील ( कोकण परिक्षेत्र), तृतीय- सागर पाटील (एसआरपीएफ)

- ४x४००मि. रिले धावणे : प्रथम - प्रशिक्षण संचालनालय, द्वितीय - एसआरपीएफ, तृतीय - मुंबई शहर.

- गोळा फेक : प्रथम - अभिजित गुंड, द्वितीय - अली शेख, तृतीय - आदिनाथ शिरसाठ

ॲथेलेटिक्स (महिला)

१५०० मी.धावणे : प्रथम - यामिनी ठाकरे (पुणे शहर-पिंपरी चिंचवड), द्वितीय - कोमल खांडेकर (मुंबई शहर), तृतीय- पद्‌मा कारंडे (पुणे शहर-पिंपरी चिंचवड).

-४०० मी. धावणे : प्रथम - प्रणाली इंदई (प्र.सं), द्वितीय - सुनिता जाधव (प्र.सं.), तृतीय - वृंदावनी आव्हाड (मुंबई शहर).

- लांबउडी : प्रथम - नीता शेंडे (प्र.सं.), द्वितीय - मनिषा लोंढे (प्र.सं.), तृतीय - उज्वला पाटील (पुणे शहर-पिंपरी चिंचवड)

- १०० मी. अडथळा धावणे : प्रथम - शितल पिंजरे (कोकण परिक्षेत्र), द्वितीय - सुनिता शिंदे (लोहमार्ग परिक्षेत्र), तृतीय - वैष्णवी शिंदे (प्र.सं.)

- ४x४०० मी. रिले धावणे : प्रथम -प्रशिक्षण संचालनालय, द्वितीय - मुंबई शहर, तृतीय - पुणे शहर-पिंपरीचिंचवड, चौथा - नागपूर परिक्षेत्र

- गोळा फेक : प्रथम - प्रियंका फलके (पुणे शहर-पिंपरी चिंचवड), द्वितीय - मनिषा निमुनकर (नाशिक परिक्षेत्र), तृतीय- वैष्णवी पाटील (प्र.सं.)

पुरुष - जलतरण व डायव्हींग

- बॅक स्ट्रोक : प्रथम - हर्षद गायकवाड (मुंबई शहर), द्वितीय - आकाश जाधव (एसआरपीएफ), तृतीय- अभिजित गवळी (एसआरपीएफ)

- २०० मी. मेडले : प्रथम - पराशर सातर्डेकर (मुंबई शहर), द्वितीय - अभिजित मोकाशी (मुंबई शहर), तृतीय - मिलिंद तबले (कोल्हापूर परिक्षेत्र)

- ४x४०० मी. फ्री स्टाईल रिले : प्रथम - मुंबई शहर, द्वितीय - एसआरपीएफ, तृतीय - कोल्हापूर परिक्षेत्र

- १५०० मी. फ्री स्टाईल : प्रथम - हर्षद गायकवाड (मुंबई शहर), द्वितीय - नासीर शिकलगार (एसआरपीएफ), मिलिंद तबले (कोल्हापूर परिक्षेत्र),

-हायबोर्ड डायविंग : प्रथम - गणेश माने (एसआरपीएफ), द्वितीय - रामचंद्र गायकवाड (कोल्हापूर परिक्षेत्र), तृतीय - आतिष नरवडे (प्र.सं.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT