नाशिक

Nashik Police News: मुंबई नाका पोलिस ठाण्याची धुरा 80 कर्मचाऱ्यांवर; मनुष्यबळाचा वाणवा

शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्यांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेले मुंबई नाका ठाण्याची केवळ ८० अधिकारी कर्मचाऱ्यांवर धुरा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police News : शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्यांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेले मुंबई नाका ठाण्याची केवळ ८० अधिकारी कर्मचाऱ्यांवर धुरा आहे. त्यामुळे ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. शिवाय येथील गुन्हेगारीतही वाढ होत आहे.

कधीकाळी भद्रकाली ठाणे शहरातील अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जात होते. ठाण्याची हद्द मोठी होती. भद्रकाली ठाण्याचे विभाजन करण्यात आले. मुंबई नाका ठाण्याचे निर्माण झाले. (Mumbai Naka Police Station has only 80 employees nashik news)

नवीन ठाणे निर्माण झाल्यापासून नेहमी चर्चेत राहिले. ठाण्यात प्रवेश करण्यासाठी एकीकडे पूजा विधी सुरू होता. त्याचवेळी ठाण्याच्या कक्षेत येणाऱ्या विनयनगर भागात अतिक्रमण काढण्यावरून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. एकामागे एक विविध प्रकारचे गंभीर गुन्हे घडत राहिले. त्यामुळे अल्पवधीकाळात येथील चार ते पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.

त्यानंतर काहीसे प्रकार कमी झाले असले तरी आजही बहुतांशी गुन्हेगारी संबंधित घटना घडत आहे. त्याचप्रमाणे ठाणे कक्षेत सुमारे १५० रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे बंगले, ग्रामदैवताचे मंदिर, महामार्ग बसस्थानक, राजकीय पक्षांचे कार्यालय अशा महत्त्वाच्या भागांसह दोन ते तीन स्लम भाग आहे. या सर्वांचा विचार केला तर ठाण्यास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ अधिक असणे आवश्यक आहे.

प्रत्यक्षात मात्र केवळ ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ठाण्याची धुरा असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यातील काही कर्मचारी मुख्यालय संलग्न आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये रात्र आणि दिवस पाळीचे नियोजन करत अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जातात.

सर्वांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. इतकेच नाही तर ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास दिलेल्या वाहनासह अन्य वाहने वारंवार नादुरुस्त होत असतात.

तर काही कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांनी शासकीय कामे करावे लागते. पोलिस ठाण्यास लॉकअप नसल्याने संशयितांना पोलिस कोठडीत ठेवणे जिकरीचे होत असते. अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर नाहीच्या प्रमाणात संख्या आहे. एकूणच मुंबई नाका ठाण्याची अतिशय बिकट अवस्था असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याकडे पोलिस आयुक्तांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

गुन्हे पोलिस निरीक्षक पद रिक्त

पोलिस निरीक्षक गुन्हे (दुय्यम पोलिस निरीक्षक) महत्त्वाचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना शासकीय कामानिमित्ताने अन्य ठिकाणी जावयाचे झाल्यास पदभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा लागतो. त्याचप्रमाणे अन्य अधिकाऱ्यांची संख्याही नगण्य आहे. १ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक निरीक्षक, ४ उपनिरीक्षक तर ग्रेड उपनिरीक्षक एकही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT