Commissioner and Administrator Ravindra Jadhav, Additional Commissioner Rajendra Fatle while guiding in the review meeting regarding property tax collection. esakal
नाशिक

Nashik News : थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा; मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांचे आदेश

महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी, संकीर्ण वसुली करवसुलीवर भर दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी, संकीर्ण वसुली करवसुलीवर भर दिला आहे. जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.

अवैध नळजोडण्या कायम करण्यासाठी चार वर्षे पाणीपट्टीचा दंड आकारून जोडणी कायम करण्यात येते. (Municipal Commissioner Ravindra Jadhav statement of not take strict action against defaulters nashik news)

त्याऐवजी दोन वर्षाचा दंड आकारून नळजोडणी कायम करा. मात्र जास्तीत जास्त वसुली झाली पाहिजे. वसुलीचा रोज आढावा घेण्यात येईल. कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी दिले.

आयुक्तांच्या परिषद दालनात मंगळवारी (ता. ९) मनपा कर वसुलीसंदर्भात आढावा व करावयाच्या उपाययोजना या संदर्भात श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, उपायुक्त हेमलता डगळे, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, श्याम बुरकुल तसेच सर्व प्रभाग अधिकाऱ्यांसह जप्ती पथक प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, महानगरपालिकेतर्फे घरपट्टी, पाणीपट्टी, मिळकतधारकांना ३१ जानेवारीपर्यंत थकबाकी रकमेवर एक रकमी भरणा केल्यास दंडात्मक व्याजावर ९० टक्के, २९ फेब्रुवारीअखेर भरणा केल्यास ७० टक्के सूट देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त थकबाकीदारांकडून संपूर्ण नळपट्टी, घरपट्टीचा एकरकमी भरणा करून व्याज, शास्तीवर सुटीचा लाभ घ्यावा.

सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी दवंडी देणे, घंटागाडीवर जाहीर आवाहन करणे यासारखी आवश्यक कारवाई करावी. विहित कालावधीनंतर चारही प्रभागांमध्ये नियुक्त जप्तीपथकाने मालमत्ता जप्त करणे, रहिवासी थकबाकीदारांकडून चैनीची वस्तू ताब्यात घेणे, नळजोडणी खंडित करणे आदी कारवाई सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

थकबाकीदार मालमत्ताधारकांनी व्याजात दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन थकीत रकमेचा भरणा करावा. मालमत्ता जप्ती व अन्य कटू कारवाई टाळावी, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

या बैठकीस जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, फैय्याज अहमद, भरत सावकार, गृहकर अधीक्षक संतोष गायकवाड, जप्ती अधिकारी दिनेश मोरे, विनय झगडे, मोहम्मद इरफान अश्रफ, जिया शेख, मोहम्मद तौसिफ अस्लम शेख आदी अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT