NMC News : शहरात पावसाळापूर्व कामे करताना गटारींची स्वच्छता केल्याचे महापालिकेकडून दाखवले जात असले तरी हे काम कागदावरच असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाला महापालिकेने देखील तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले आहे.
शहरात १२१ किलोमीटर पावसाळी नाल्यांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतल्याचा दावा केला आहे. ( Municipal Corporation presented information on monsoon sewer cleaning nashik news )
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यात शहरातील पावसाळी गटारी झोपडपट्टी विभागातील यांची अवस्था अतिशय खराब झाल्याचे नमूद केले आहे. यामुळे नागरिकांना पावसाळ्यापूर्वीच विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या जाणवत असून महापालिकेचा बांधकाम व आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात शहरातल्या मुख्य चौकांमध्ये पाणी साचते, रस्त्यांवर अपघात होतात, दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी साचून आर्थिक नुकसान होते. पावसाळ्यांमध्ये चौकांमध्ये पाणी साचणार नाही, यासाठी पावसाळी गटारीचे ढापे, जाळ्या याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
बांधकाम विभागाने तातडीने यात दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा युवासेनेच्या पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख अंबादास जाधव, महानगर प्रमुख दिगंबर नाडे, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख विशाल खैरनार, देवळाली विधानसभा प्रमुख किरण राक्षे, पश्चिम विधानसभा प्रमुख सनी पवार, उपप्रमुख अमय जाधव आदी उपस्थित होते.
बांधकाम विभागाने आरोप फेटाळले
महापालिकेच्या बांधकाम विभागाने युवा सेनेने केलेले आरोप फेटाळले. माध्यमांना दिलेल्या माहितीत शहर अभियंता शिवकुमार वंजारी म्हणाले, शहरात १२१ किलोमीटर लांबीचे पावसाळी नाले आहे. यातील ४९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यांची स्वच्छता सुरू असून ३४.६४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे.
१४.४१ किलोमीटर लांबीची कामे शिल्लक आहे. ३६४ किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारींवर १३ हजार ९४६ चेंबर्स आहे यातील ८ हजार १४५ चेंबर स्वच्छ करण्यात आले आहे ९० किलोमीटर लांबीच्या खुल्या गटारींपैकी ५१.४६ किलोमीटर लांबीच्या गटारींची स्वच्छता हाती घेण्यात आली असून ३४.१४ किलोमीटर लांबीच्या गटारींची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.