Municipal Smart School in Kathe Galli. esakal
नाशिक

NMC Smart School: डिजिटल शिक्षणासाठी मनपा विद्यार्थी सज्ज; स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे दिवाळीनंतर उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

NMC Smart School : महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित झाल्या आहे. ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या असून, दिवाळीनंतर प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक अशा एकूण १०० शाळांमध्ये २९ हजार ८५२ विद्यार्थी शिक्षण घेतात. खासगी शाळांच्या बरोबरीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत उतरण्याच्या उद्देशाने स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. (municipal school converted to digital classroom under smart school project nashik news)

प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ८२ शाळांच्या ६५६ वर्गखोल्यांमध्ये डिजिटल कंटेंट, इंटरनेट व स्कूल अॅडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, लॅन कनेक्टिव्हिटी युक्त ७५ इंची डिजिटल बोर्ड बरोबरच ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बॅच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाईट‌्स, छतावरील पंखे पुरविण्यात आले आहेत. शाळांमधील वर्ग खोल्यांचे रंगकाम, किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.

पॅलेडिअम कंपनीच्या माध्यमातून माध्यमातून पाच वर्षांसाठी प्रकल्पाची देखभाल होत आहे. काठे गल्ली भागातील अटल बिहारी वाजपेयी शाळेत प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. त्यानंतर सर्व शाळांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

६९ शाळांमधील संगणक कक्ष व मुख्याध्यापक कक्षाचे काम पूर्ण झाले आहे. सर्व वर्गांमध्ये डिजिटल पॅनल बसविले असून, क्लाऊड आधारित शाळा प्रशासन सॉफ्टवेअर, २०० एमबीपीएसच्या किमान गतीसह ब्रॉडबॅण्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. वर्ग खोल्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता ६९ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा तयार केल्या जात आहे.

संगणक कक्षात २० संगणक, १ सर्व्हर, १ प्रिंटर आणि लॅन कनेक्टिव्हिटी पुरविण्यात आली आहे. प्रत्येक संगणक कक्षात एअर कंडिशनर बसविण्यात आले आहेत. यासोबतच नेटवर्क रॅक, अग्निशमन यंत्रणे, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, कॉम्पुटर टेबल, खुर्ची, शिक्षक टेबल, डस्टबिन, शू रॅक उपलब्ध करून देण्यात आले असून, रंगकाम व किरकोळ दुरुस्तीची कामेही करण्यात आली आहेत.

आठशे शिक्षकांना प्रशिक्षण

मुख्याध्यापकांच्या दालनात नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार असून यात एक संगणक, बायोमेट्रीक अटेंडन्स प्रणाली व एक प्रिंटर सुविधा आहेत. मुख्याध्यापकांना एक टॅबलेट, सीसीटीव्ही कॅमेरा फीडचे निरीक्षण करण्यासाठी ३२ इंची एलईडी टीव्ही, आदी वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

"स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित झाल्या आहे. ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत." - बी. टी. पाटील, प्रशासनाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या वाटेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT