Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Uddhav Thackeray Group: म्युनिसिपल सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे! शिंदे गटाला धक्का

सकाळ वृत्तसेवा

Uddhav Thackeray Group : नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे देण्याचा निर्णय दिला आहे, त्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

दरम्यान, कामगार सेनेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २७) होऊन त्यात अध्यक्षपदी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची निवड झाली. (Municipal Sena office taken over by Uddhav Thackeray Group high court declare shock to Shinde group nashik political news)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील वर्षी २१ ऑक्टोबरला नाशिक महापालिकेत कामगार संघटनेच्या कार्यालयाचा ताबा कोणत्या गटाकडे यावरून वाद होऊन चार दिवसांतच शहर पोलिस प्रशासनाने सहाय्यक पोलिस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, नाशिक शहर पोलिस यांनी कलम १४५ आणि कलम १४६ च्या अधिकारांतर्गत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालय सील केले होते.

याविरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना पोलिस प्रशासनाला बेकायदेशीर केलेली ऑर्डर माघार घेण्यास सांगितले. पोलिस प्रशासनाने दोन दिवसाची वेळ मागून घेतली आणि मंगळवारी (ता. २७) न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने निकाल झाला.

उच्च न्यायालय मुंबई येथे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे ॲड. यशोदीप देशमुख, ॲड. वैदेही प्रदीप आणि ॲड. गजानन तेलंग्रे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सहाय्यक पोलिस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, शहर पोलिस नाशिक यांनी कलम १४५ आणि कलम १४६ नुसार केलेली कार्यवाही न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली. तसेच त्यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली, की सदर कार्यालयाचा ताबा हा कोणास द्यावा याचे निर्णय नाशिक महापालिकेने घ्यावे.

त्यास विरोध करत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचे वकील यशोदीप देशमुख यांनी कोर्टास असे निदर्शनास आणून दिले की, सदर कार्यालय हे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या युनियनचे आहे. आणि सदर युनियनचे अध्यक्ष आमचे पिटिशनर हे आहेत.

यावर न्यायालयाने पिटिशनर सुधाकर बडगुजर यांचे वकील यशोदीप देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालय हे पिटिशनर सुधाकर बडगुजर यांना देण्याबाबत नाशिक महापालिकेस आदेश जारी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार

Khandesh News: भाजपच्या पहिल्या यादीत खानदेशातील 10 उमेदवार! विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम; रावेर, धुळ्याला नव्या चेहऱ्याना संधी

Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

सुंदर विषय तरीही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; प्रियांकाच्या 'पाणी'ने २ दिवसात किती केली कमाई?

Ranji Trophy: 15 Sixes! जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदने एकाच सामन्यात ठोकल्या दोन सेंच्युरी, मोठ्या विक्रमालाही गवसणी

SCROLL FOR NEXT