Murder esakal
नाशिक

नाशिक : डोक्यात दगड घालून शेतमजूराचा खून

रोशन खैरनार

सटाणा : शहरालगत असलेल्या कंधाणे फाट्यासमोरील शेतात डोक्यात दगड घालून शेतमजूराचा खून करण्यात आल्याची घटना आज रविवार (ता. ३) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घमजी रंगनाथ माळी (वय ५०, रा.पिंगळवाडे) असे शेतमजूराचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली असून सटाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजारासाठी बाहेर गेले अन्...

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरेनगर (ता.बागलाण) येथील शेतकरी जितेंद्र सोनवणे यांच्या शेतात घमजी रंगनाथ माळी (वय ५०) गेल्या काही वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करत होते. काल शनिवार (ता.२) रोजी सटाणा येथे आठवडे बाजार असल्याने बाजार करण्यासाठी घमजी माळी हे घराबाहेर पडले होते. रात्री उशिर झाला तरी पती घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी चिंतेत होत्या. त्यांनी पतीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.

मृतदेह बघताच बघ्यांना घाम फुटला

आज रविवार (ता.३) रोजी सकाळी आठ वाजता शहरालगत असलेल्या कंधाणे फाट्यासमोरील विलास दादाजी सोनवणे यांच्या शेताजवळ घमजी माळी यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून दगडाने त्यांचा चेहरा ठेचण्यात आला आहे. मृतदेहाशेजारीच खुनात वापरलेला मोठा दगड पडला होता. सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बघताच बघ्यांना भीतीमुळे घाम फुटला. त्यांनी तत्काळ सटाणा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, पोलिस हवलदार हेमंत कदम, जिभाऊ पवार, अजय महाजन, भास्कर बस्ते, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहास येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविण्यात आले. दरम्यान, या खुनामध्ये कुणाचा हात असावा, त्यामागील उद्देश काय असावा यासंदर्भात पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT