Ravidatt Rajendra Choube esakal
नाशिक

Nashik Crime: खळबळजनक! म्हसरुळ-आडगाव लिंक राेडवर एका सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : भररस्त्यात वाद घालत धुडगूस घालणाऱ्या मद्यपी तरुणांना लष्कर निवृत्त झालेल्या सेवकाने हटकले असता, तरुणांनी त्याची भाेसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना म्हसरुळ-आडगाव लिंक राेडवर साेमवारी रात्री घडली.

शहरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्येचीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर, तीनच दिवसांपूर्वी शहर पाेलिस आयुक्त पदाचा पदभार घेतलेल्या संदीप कर्णिक यांना तरुण संशयितांनी गंभीर घटना घडवून सलामी दिल्याचे बाेलले जात आहे. रवीदत्त राजेंद्र चाैबे (वय ४२) असे खूनाच्या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Murder of exserviceman in Mhasrul area Incident on Mhasrul adgaon Link Road Nashik Crime)

म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसरूळ आडगाव लिंक रोडवरील ही घटना रात्री सात ते साडे सात वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर म्हसरुळ पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

रवी चौबे हे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरती फरसाण कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला.

मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांना शासकिय रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

चौबे हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त आहेत. शहरातील एका शैक्षणिक संस्थेत ते वॉर्डन म्हणून कार्यरत हाेते, असे समजते.

टाेळीचा सहभाग

घटनेतील दाेन संशयितांसह त्यांचे साथीदार हे म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहना चालकांना अडवत पैशांची मागणी करत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

येथील सुरती फरसाण व जगन्नाथ लॉन्सजवळ संशयितांनी मद्याच्या नशेत अनेक वाहने अडवून काही वाहनांच्या काच्या फोडल्या. तर चालकांकडून खंडणीची मागणी करत दमदाटी केली.

यातील काही पीडित चालक हे संशयितांची गुंडागर्दी सुरु असल्याची कैफियत घेऊन म्हसरूळ पोलिस ठाण्यात गेले हाेते. त्याचवेळी संशयितांनी चाैबे यांच्यावर हल्ला करुन हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT