murder of old woman remains mystery nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : 3 आठवडे उलटूनही वृद्धेच्या खुनाचे उलगडेना गूढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जेल रोड परिसरात घरात एकट्या असलेल्या ६० वर्षीय वृद्धेच्या निर्घृण खुनाचे गूढ तीन आठवड्यानंतरही कायम आहे. उपनगर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकांकडूनही या गुन्ह्याचा तपास करताना अद्यापही काहीही ठोस हाती लागलेले नाही.

एकूणच, चहूबाजूने चौकशा, तपास करूनही हाती काही लागत नसल्याने सदरचा तपासच थंडावल्याचे सध्याचे चित्र आहे. (murder of old woman remains mystery nashik crime news)

सुरेखा ऊर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (६०, रा. श्री स्वानंद रो हाऊस, हनुमंत नगर, लोखंडे मळ्याजवळ, उपनगर) यांचा १८ जूनला अज्ञात संशयितांने घरात एकट्या असल्याची संधी साधून त्यांचा निर्घृण खून केला होता. तसेच, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेले. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

उपनगर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी कसोशीने तपास करण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळापासून आसपासचे सीसीटीव्ही शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आसपास कुठेही सीसीटीव्हीच उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी आहेत. घटनेच्या आधीचे सहा ते आठ तासांपूर्वीचे मोबाईलचे लोकेशन तसेच सीडीआर पडताळले. परंतु, त्यातही पोलिसांच्या हाती काहीही लागू शकलेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच मार्गांवरील दूरपर्यंत सीसीटीव्ही पडताळून पाहिले, मात्र तीन आठवडे उलटूनही अद्याप या गुन्ह्यातील पुरावे पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाही. पोलिसांनी फॉरेन्सिककडेही आवश्यक पुराव्यांचे अहवाल मागितले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. बेलेकर यांच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

उपनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथकांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथकही या गुन्ह्याचा शोध घेताना थंडावल्याचे सध्याचे चित्र आहे. कोणताही धागा हाती लागत नसल्याने पोलिसही चक्रावले आहेत. तर दुसरीकडे मयत बेलेकर यांच्या नातलगांमध्ये पोलिसांच्या थंडावलेल्या तपासाबाबत नाराजी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT