Jaykheda: While discussing with the Muslim brothers, Police Inspector Purushottam Shirasath, Deputy Sarpanch Sanjay More and Muslim brothers. esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi Bakri Eid : जायखेड्यात कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण एकाच दिवशी आल्याने आषाढीच्या निमित्ताने मांस विक्री न करण्याचा तसेच बकरी ईद असूनही ‘कुर्बानी’’ न देण्याचा कौतुकास्पद निर्णय जायखेडा (ता. बागलाण) येथील मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे.या निर्णयामुळे हिंदू बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

जायखेडा गांव वै. ह.भ.प.कृष्णाजी माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी असून वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. एकादशीला तुळशीमाळ परिधान करण्यासाठी व माऊली स्मारकस्थळी दर्शनासाठी शेकडो भाविक येथे येत असतात.(Muslim community members of Jaikheda have taken commendable decision not to sell meat on occasion of Ashadhi and not to offer Qurbani despite Bakrid Nashik News)

पंढरपूर येथे न जाऊ शकलेले वारकरी भाविक हि येथे मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी हजेरी लावतात यामुळे येथे यात्रेचे स्वरूप असते.

या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व उपसरपंच संजय मोरे यांनी मुस्लिम समाजाची बैठक घेऊन गुरुवार (दि.२९) रोजी बकरी ईद व एकादशी एकाच दिवशी असल्याने त्यादिवशी कुर्बानी न देण्याचे व मांस विक्री न करण्याचे आवाहन केले होते.

यास मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘कुर्बानी’’ न देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आनंद व्यक्त होत आहे. हा निर्णय जायखेड्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श असल्याचे उपसरपंच संजय मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, उपसरपंच संजय मोरे, नसिरखान पठाण, निमन सैय्यद, सत्तार पठाण, वाजीद सैय्यद, गालिब शेख, हर्षोद्दीन शेख, हमीद कादरी, सैय्यद शाकिर, मनजुर पठाण, इम्रान शेख, हजी निसार शेख, हजी हलीम शेठ आदींसह मुस्लिम तरुण व जेष्ठ समाज बांधव उपस्थित होते.

"वै.ह.भ.प. कृष्णाजी माऊलींनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जायखेडा गावांचा नाव लौकिक आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गावाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. आषाढीला शेकडो भाविक माऊली स्मारकस्थळी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे."

संजय मोरे, उपसरपंच जायखेडा.

"जातीय सलोखा अबाधित राहावा व जाती धर्मातील श्रद्धा व परंपरांचा सन्मान व्हावा यासाठी मुस्लिम समाजाने एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा घेतलेला निर्णय नवीन पिढीसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे."

पुरुषोत्तम शिरसाठ, सहा. पोलीस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT