Fake documents esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची परस्पर विक्री; न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रकाली पोलिसांत गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : वृद्ध महिलेचे बनावट कागदपत्र बनवून मखमलाबाद शिवारातील जमीन परस्पर १ कोटी ८१ लाखात विक्री केल्याचा प्रकार घडला.

वृद्ध महिलेच्या नातूच्या तक्रारीवरून ४ संशयितांविरुद्ध मंगळवार (ता. २) सायंकाळी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे ८ ते १० वर्षानंतर प्रकार उघडकीस आला. (Mutual sale of land through forged documents Crime in Bhadrakali Police court order Nashik Fraud Crime)

बाळू वनाजी माळी यांचे अपत्य मयत होते. संशयित सचिन त्र्यंबकराव मंडलिक (३२, रा. आनंदवली), किशोर विष्णू शिंदे (४२, रा. आनंदवली), सुरेश कारभारी गांगुर्डे (५५, रा. कामगारनगर, सातपूर), उदय भास्करराव शिंदे (५५, रा. मेघदूत शॉपिंग सेंटर, सीबीएस), अशा चौघांनी जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये फेरफार केली.

बाळू वनाजी माळी यांचे अपत्य मयत असताना मयत ऐवजी मुक्ता नावाची फेरफार केली. वृद्ध महिला माळी यांचे वारसदार असल्याचे दर्शविले. काही कोऱ्या कागदांवर महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेतले.

मखमलाबाद शिवारातील शेतजमीन मिळकत क्रमांक ३२/२/१ यासी क्षेत्र २५९४.३९ चौरस मीटर पैकी १२९७.१९ चौरस मीटर क्षेत्राचा खोट्या आशियाचे साठेखत आणि करारनामा तयार केला. करारनामा तयार केलेली जमीन १ कोटी ८१ लाखात विक्री केल्याचे भासविले.

त्यापैकी ३१ लाख तक्रारदार यांच्या आजी अर्थात वृद्ध महिलेच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे दाखवून खोटे कागदपत्र तयार केले. संबंधित जमिनीशी वृद्ध महिलेचा दूरपर्यंत कुठलाही संबंध नसताना त्यांना वारस दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारदार भूषण भीमराज मोटकरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाकडून भद्रकाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करण्यात आले.

त्यानुसार मंगळवार (ता. २) भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे अधिक तपास करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT