MVP election Latest News esakal
नाशिक

MVP Election : निफाड, दिंडोरी, कसमादेने सोडली ‘प्रगती’ची साथ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदाच्‍या उमेदवार निश्‍चितीवेळी घडलेल्‍या नाट्यमय घडामोडी, ज्‍येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्‍या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्‍यक्‍त केलेली नाराजी परिवर्तन पॅनलच्‍या पथ्यावर पडल्‍याचे बोलले जात आहे.

त्‍यातच निफाड, दिंडोरीसह कसमादे पट्ट्यातील सभासदांनी प्रगती पॅनलची साथ सोडल्‍याने तब्‍बल २० वर्षांनंतर संस्‍थेत परिवर्तन घडले. सत्ताधाऱ्यांकडून विकासाचा आढावा सभासदांपुढे मांडला जात असताना, विरोधकांनी एकाधिकारशाहीची केलेली टीका निवडणूक प्रचाराच्‍या केंद्रस्‍थानी राहिली. (MVP Election 2022 Niphad Dindori Kasmade not helped pragati panel nashik Latest Marathi News)

राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्‍था असलेल्‍या मविप्र संस्थेच्या‍ पंचवार्षिक निवडणुकीकडे सभासदांसह संपूर्ण जिल्‍हावासीयांचे लक्ष लागून होते. रविवारी (ता. २८) मतदानानंतर सोमवारी (ता. २९) मतमोजणी झाली. प्रारंभीपासून परिवर्तन पॅनलच्‍या उमेदवारांमध्ये आत्‍मविश्‍वास व उत्‍साह दिसत होता.

यंदाच्‍या निवडणुकीत एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून सभासदांपुढे गेल्‍या १२ वर्षांमध्ये साधलेला विकास मांडण्यात आला. संस्‍थेच्‍या मालकीच्‍या जमिनीत केलेली वाढ, सुसज्‍ज इमारतींचे केलेले बांधकाम यांसह एकंदरीत कोविड काळात केलेली कामगिरी सभासदांपुढे मांडली होती. दुसरीकडे परिवर्तन पॅनलने सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठविली होती.

एकाधिकारशाही, खालावलेला विकास निधी, कोविड काळात रुग्‍णालयातील मृत्‍युदर आदी मुद्दे प्रचारात चर्चिले गेले. सर्वाधिक सभासदसंख्या असलेल्‍या निफाडसह दिंडोरी, सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा आदी भागातील सभासदांनी प्रगतीऐवजी परिवर्तन पॅनलला दिलेली साथ लक्षवेधी ठरली.

वारस सभासद निर्णायक

संस्‍थेची सभासदसंख्या वाढविण्यासंबंधी काय करता येईल, याविषयी घटना समिती स्‍थापन करण्यात आली होती. या समितीने निधन झालेल्‍या सभासदांच्‍या वारसांना सदस्‍यत्‍व देण्याचा प्रस्‍ताव दिला होता. त्‍यानुसार २०१२ पासून जवळपास तीन हजार ९०० वारस सभासद झाले. हे सभासद प्रगतीच्‍या बाजूने असल्‍याचा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्‍यक्षात मात्र वारस सभासदांचा परिवर्तनसाठी निर्णायक कौल ठरल्‍याचे बोलले जात आहे.

राजकीय खेळी फसली

सुरवातीला सरचिटणीसपदासाठी ज्‍येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी उमेदवारी करावी, यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्‍यांना साकडे घातले होते. त्‍यानुसार श्री. पवार यांनी श्री. शेटे यांना उमेदवारीसाठी तयारदेखील केले; परंतु नंतरच्‍या भेटीत सभासदांचा आग्रह आपण सरचिटणीसपदाची उमेदवारी करावी, असा असल्‍याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

पुस्‍तक प्रकाशन समारंभात याविषयी शरद पवार यांनी नाराजीदेखील व्‍यक्‍त केली होती. असे असले तरी श्रीराम शेटे संपूर्ण प्रचारादरम्‍यान प्रगती पॅनलच्‍या सभांमध्ये व्‍यासपीठावर विराजमान राहिले. श्री. शेटे यांनी त्‍यांची साथ दिली असली तरी कुठेतरी या घटनाक्रमाने सभासदांची नाराजी प्रगती पॅनलने ओढावून घेतल्‍याचीही चर्चा होती.

भाऊ, मित्राचा विजय

नात्‍यागोत्‍यांच्‍या या निवडणुकीत निरनिराळे रंग बघायला मिळाले. नाशिक ग्रामीणसाठी प्रगती पॅनलचे उमेदवार सचिन पिंगळे यांनी रात्री उशिरा चुलत भाऊ असलेले प्रतिस्‍पर्धी व परिवर्तन पॅनलचे उमेदवार रमेश पिंगळे यांची भेट घेत अभिनंदन केले, तर जय-वीरूची जोडी असलेल्‍या केदा आहेर व विजय पगार यांच्‍या लढतीकडेही लक्ष लागून होते. या लढतीत जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर यांचा पराभव करत त्‍यांचे मित्र परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजय पगार यांनी विजयश्री मिळविला.

परिवर्तन घडले पण कोकाटेंशिवाय

निवडणुकीत परिवर्तन पॅनलने लक्षवेधी कामगिरी केली; परंतु अध्यक्षपदी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांना पराभव पत्‍कारावा लागला. सभांमध्ये घणाघाती करताना कोकाटेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. एकीकडे संपूर्ण पॅनलच्‍या यशस्‍वी कामगिरीत कोकाटेंचा झालेला पराभव चर्चेचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT