NAMCO Bank Election esakal
नाशिक

NAMCO Bank Election: गिते, साने, भंडारी, छाजेड, जैन, गोठींचे अर्ज वैध; हरकती फेटाळल्या

सकाळ वृत्तसेवा

NAMCO Bank Election: नाशिक मर्चंट्स बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्जांच्या छाननीत सोमवारी (ता. ४) १२ माजी संचालकांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश असल्याने सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, कांतिलाल जैन, अविनाश गोठी, शोभा छाजेड यांच्यासह बारा संचालकांचे अर्ज अवैध ठरवावे, अशी हरकत घेण्यात आली होती.

या हरकतीवर रात्री उशिरापर्यंत युक्तिवाद झाला, अखेरीस ही हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे अर्ज भरलेल्या वरील सहा सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. (NAMCO Bank Election Gite Sane Bhandari Chhajed Jain Gothi applications are valid nashik news)

वैध उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी (ता. ५) सकाळी सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलाणी यांनी दिली आहे. जिल्ह्यासह परराज्यात कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यंदा इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाल्याने २१ जागांसाठी तब्बल १७८ सभासदांनी २७२ अर्ज दाखल झाले आहेत.

या अर्जाची छाननी प्रक्रिया सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनसेचे संदीप भंवर, विजय बोरा आणि अशोक संकलेचा यांनी हरकती घेतल्या. यात संदीप भंवर यांनी गेल्यावेळी घेतलेलीच हरकत यंदा घेतली होती. त्यानुसार साखर घोटाळा प्रकरणात सेाहनलाल भंडारी, वसंत गिते, नरेंद्र पवार, विजय साने, शिवनाथ कडभाने, अविनाश गोठी, कांतिलाल जैन, शिवनाथ डागा, शोभा छाजेड, प्रफुल्ल संचेती, सुभाष नहार, अरुण मुनोत यांच्याविरोधात ही हरकत घेतली होती.

यात १९९५ ते २००० या कालावधीत आजी-माजी संचालक आहेत. उच्च न्यायालयाने या सर्वांकडून तीन कोटी ४० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याशिवाय अर्ज मंजूर करू नये, अशी मागणी संदीप भंवर यांनी हरकत घेताना केली होती.

संचालकांतर्फे ॲड. जालिंदर ताडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मुलाणी यांच्याकडे युक्तिवाद केला. श्री. भवर यांनी स्वत: आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक अधिकारी मुलाणी यांनी भंवर यांच्या सर्व हरकती फेटाळून लावल्या. याशिवाय येवला मर्चंट्स बँकेचे माजी संचालक मनीष काबरा यांच्या विरोधात अशोक संकलेचा यांनी हरकत घेतली होती, त्यावर रात्री उशिरापर्यंत युक्तिवाद झाला.

पन्नास लाखांच्या दंडाचे प्रकरण

नामको बँकेला प्रशासकीय राजवटीत ५० लाख रुपयांचा दंड झाला होता. त्यावर विजय बोरा यांनी हरकत घेतली होती, ही रक्कम संचालकांनी स्वत: न भरता ती बँकेतून भरल्याचा त्यांचा आक्षेप होता. मात्र हे प्रकरणदेखील प्रशासकीय राजवटीतील अनियमितेप्रकरणी असून, संचालक मंडळाचा त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर ही हरकत देखील फेटाळण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT