सातपूर (जि. नाशिक) : नाशिक मर्चंट्स को- ऑपरेटिव्ह बँकेत (NAMCO) जिल्ह्यातील एकूण १७ बँकेचे चालू खाते (Current Account) होते. प्रशासक कारकीर्दीत एनपीए वाढल्याने आपली बँक राहिली नव्हती व बँक नसताना हे खाते बंद करणे आवश्यक होते.
मात्र, मार्च २०१९ अखेर अशी १९ खाती असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. संबंधित दोष मार्च २०१९ च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालात नमूद असून, बँकेने त्याची पूर्तता करून सर्व खाती बंद केलेली आहेत व नमूद दोषांची पुपूर्तता केलेली आहे, असे बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी सांगितले. (NAMCO Bank in face problem due to mismanagement of administration Chairman Hemant Dhatrak NAMCO Bank Latest News)
तसेच, ज्या मृत चालू खातेदारांच्या वारसांना व्याज देणे आवश्यक होते, तेदेखील बँकेने अदा करून दोषांचे निराकरणही केले आहे. अदा करावयाच्या व्याजाची रक्कम ही फक्त २३९७७ रुपये होती. संचालक मंडळाचा कालावधी सुरू झाल्यापासून संबंधित पूर्तता या बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेस कळविलेल्या आहेत व नमूद दोषांचे निराकरण केले आहे.
तथापि बँकेस ५० लाख इतका दंड झाला आहे. याबाबत संचालक मंडळाने दोषी कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे ठरविले असून, संचालक मंडळ कोणालाही पाठीशी न घालता पारदर्शक काम करण्यासाठी सदैव बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेस मार्चअखेर बँकेचा ग्रॉस एनपीए सात टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, तो ५. १८ टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेने निकष पूर्ण केले आहेत. तसेच, निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. बँकेला आर्थिक वर्षात २९ कोटी १९ लाख निव्वळ नफाही झाला आहे.
अशी सर्व सुस्थिती असतानाही बँकेबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष धात्रक यांनी माहिती दिली. बँकेचे उपाध्यक्ष अशोक सोनजे, जनसंपर्क संचालक रंजन ठाकरे, शिवदास, संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, विजय साने, प्रकाश दायमा, डागा, अविनाश गोठी, सुभाष नहार, कांतिलाल जैन, हरीश लोढा, गणेश गिते, संचेती, नरेंद्र पवार, महेंद्र बुरड, संतोष धाडिवाल, भानुदास चौधरी, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, प्रशांत दिवे, आनंद बागमार, जयंत ससाणे, बँकेचे जनरल मॅनेजर त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.