police commissionerate Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik : आयुक्तालय हद्दीतील 4 विभागाचे नामकरण

नरेश हाळणोर

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलिस ठाण्यांच्या सुलभ कामकाजाच्या हेतूने दोन परिमंडळांतर्गंत असलेल्या चार विभागाचे नव्याने नामकरण करण्यात आलेले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner jayant Naiknavare) यांच्या सूचनेप्रमाणे हे बदल झाले आहेत. शहर पोलिस आयुक्तालय (Commissionerate) हद्दीत दोन परिमंडळ आहेत.

या दोन परिमंडळांतर्गत १३ पोलिस ठाणे शहरात अस्तित्वात आहे. यापूर्वी या दोन परिमंडळ अंतर्गत या १३ पोलिस ठाण्याची विभागणी करण्यात आलेली आहे. (Naming of 4 Divisions within police Commissionerate limits Nashik Latest Marathi News)

परिमंडळ एकअंतर्गत दोन विभाग असून, त्याअंतर्गत ७ पोलिस ठाणे आहेत. तर, परिमंडळ दोनअंतर्गत दोन विभाग असून, त्याअंतर्गत ६ पोलिस ठाणे आहेत. यापूर्वी दोन्ही परिमंडळ अंतर्गत असलेल्या विभागांना विभाग १, विभाग २, विभाग ३ आणि विभाग ४ असे नावे देत विभागणी केलेली होती.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या सूचनेनुसार, आता या दोन्ही परिमंडळअंतर्गत असलेल्या चार विभागातील त्याअंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यांची नावे देण्यात आली आहे. त्यानुसार, परिमंडळ १ अंतर्गत विभाग १ मध्ये पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ या तीन पोलिस ठाण्यांचा समावेश असून, या विभागाला पंचवटी विभाग असे नामकरण करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे विभाग दोनमध्ये भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका आणि गंगापूर या चार पोलिस ठाण्यांचा समावेश असून, या विभागास सरकारवाडा विभाग असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच, परिमंडळ २ अंतर्गत विभाग तीनमध्ये अंबड, इंदिरानगर, सातपूर या तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

या विभागास अंबड विभाग तर, विभाग चारमध्ये असलेल्या नाशिक रोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलिस ठाणे आहेत. या विभागाला नाशिक रोड विभाग असे नामकरण करण्यात आले आहे. या चारही विभागांवर सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असते.

तर, चारही सहाय्यक आयुक्तांवर परिमंडळ एक व दोनचे उपायुक्तांची देखरेख असते. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या सूचनेनुसार सदरील बदल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT