thermal power station nashik  esakal
नाशिक

Nashik News : थर्मल पॉवर प्रोजेक्ट ‘महाजनको’कडे हस्तांतरित करा : नामकर्ण आवारे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर थर्मल पॉवर लि. हा एक हजार ३५० मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती व कोळसा वाहतुकीसाठी निर्माण होत असलेला रेल्वे प्रकल्प आहे. तो आहे त्या स्थितीत महाजनको कंपनीकडे हस्तांतरित करून कार्यान्वित करण्यासाठी शासनातर्फे उपाययोजना करण्याची मागणी स्टाइस संस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी केली आहे.

दरम्यान, या विषयात मी स्वतः लक्ष घालून निर्णय घेण्यासाठी महावितरण कंपनीस निर्देश दिले जातील, अशी ग्वाही महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिल्याचे आवारे यांनी सांगितले.

विवेक स्पार्क फाउंडेशन (पुणे) यांनी शनिवारी (ता. २८) पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, पर्यटन, कृषी, सहकार, सामाजिक अशा विविध विषयांवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रासाठी स्टाइस संस्थेचे चेअरमन आवारे यांनी पूर्णवेळ हजेरी लावली. (Namkaran Aware statement Transfer of thermal power project to Mahagenco nashik news)

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महावितरण कंपनीचे संचालक पाठक, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजप उद्योग विकास आघाडीचे मारू आदी उपस्थित होते. इंडियाबुल्स इंडस्ट्रीज इन्फास्ट्रक्चर लि. कंपनीने प्रत्यक्ष एक हजार ४२८ एकर जागेवर ले-आउटप्रमाणे कच्च्या रस्त्याची कामे पूर्ण केली असून, एकूण दोन हजार ५८८ एकर जमिनीस चारही बाजूंनी कंपाउंड वॉलही करण्यात आले आहे.

सदर सेझ प्रकल्पाचा गेल्या १७ वर्षांत पूर्णपणे बोजवारा उडाला असून, सदर प्रकल्प पुन्हा सुरू होईल किंवा कसे, हे आज सांगणे कठीण असल्याचे आवारे यांनी निवेदनात म्हटले आहे. ‘सेझ’च्या एकूण दोन हजार ५८८ एकर जमिनीपैकी एकूण एक हजार ७२ एकर जमीन थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी मे. सिन्नर थर्मल पॉवर लि. या कंपनीला, तसेच ८८ एकर जमीन सिमेंट प्रकल्पासाठी इरोटॉस प्रा. लि. या कंपनीच्या वे भाडेपट्ट्याने दिलेली आहे.

‘सेझ’साठी केवळ एक हजार ४२८ एकर जमीन शिल्लक आहे. ‘सेझ’ स्थापन करण्याचा सरकारचा मूळ उद्देश व ‘सेझ’ सुरू करून ‘एमआयडीसी’ने स्वीकारलेल्या निर्यातक्षम उद्योगांना बळ देण्याच्या धोरणाची सर्वसामान्य पूर्तता करू शकत नसल्याने प्रकल्प बारगळला आहे. सिन्नर थर्मल पॉवर लि. या कंपनीने या जमिनीवर थर्मल पॉवरचे एकूण पाच युनिट उभारले आहेत. थर्मल पॉवर स्टेशनसाठी लागणारा कोळसा रेल्वेने आणणार असल्याचे निश्चित केले.

त्याप्रमाणे ओढा (ता. नाशिक) रेल्वेस्थानकापासून गुळवंचपर्यंत रेल्वेलाइन टाकण्याचे निश्चित झाले. ७५ टक्के जमीन संपादन होऊन रेल्वे लाइनचे काम करण्यात आले. पुढच्या कामांसाठी ६०० कोटींची आवश्यकता आहे.

वीजनिर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक असलेले ५०० एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी गोदावरी नदीत एकलहरे येथे पंपिंग हाउसचे बांधकाम पूर्ण करून एकलहरे ते गुळवंचपर्यंत पाइपलाइन टाकून काम पूर्ण करण्यात आले असल्याचे आवारे यांनी अधोरेखित केले आहे.

कर्ज थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर

वीजनिर्मिती प्रकल्पासाठी सदर कंपनीने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन केंद्र सरकारच्या वित्तीय संस्थेच्या अधिपत्त्याखाली पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस, एचडीएफसी व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज घेतले. त्यासाठी एक हजार ७२ एकर जमीन संबंधित बँकांकडे तारण ठेवण्यात आली आहे.

थकीत कर्जाची रक्कम आजमितीला व्याजासह २५ हजार कोटींपर्यंत पोहोचली असून, कर्ज ‘एनपीए’ झाले आहे. यामुळे एक हजार ७२ एकर जमिनीचा कब्जा वित्तीय संस्थांनी घेतला असून, लिलाव होण्याची दाट शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नव्या उद्योगांसाठी एक हजार ४२८ एकर जमीन मिळावी

‘सेझ’ची एक हजार ४२८ एकर जमीन नवीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रथम केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे नोटीफाईड केलेला सेझ डिनोटीफाईड करावा, ‘सेझ’मध्ये शिल्लक असलेली एक हजार ४२८ एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे वर्ग करून नव्या उद्योगांना वाटप करण्यासाठी उद्योग विभागाकडे पाठपुरावा व्हावा, अशी मागणी या वेळी आवारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT