Nampur Bazar Samiti esakal
नाशिक

Nampur Bazar Samiti: नामपूर बाजार समितीत ‘प्रशासकराज’! स्वप्नील मोरे यांची प्रशासकपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

Nampur Bazar Samiti : येथील बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची पाच वर्षांची वादग्रस्त कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर सहकार विभागाने तातडीने येथील बाजार समितीवर प्रशासकांची नेमणूक केली आहे.

विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकीय फिल्डिंग लावण्यात आली होती.

परंतु सहकार विभागाने एका दिवसाची मुदतवाढ न देता मालेगाव येथील प्रथम श्रेणीचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. (Nampur Bazar Samiti Appointment of Swapneel More as Administrator nashik news)

येथील बाजार समितीचे संचालक मंडळ २१ जून २०१८ रोजी शेतकऱ्यांनी निवडून दिले होते. त्यामुळे २० जूनला संचालक मंडळाची मुदत संपल्याने नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यमान संचालक मंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या काही महिन्यापूर्वी माजी सभापती कृष्णा भामरे यांनी बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली होती.

बाजार समितीच्या कारभाराच्या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार विभागाने तातडीचे पाऊल उचलून संचालक मंडळाला पायउतार केले आहे.

बाजार समितीची मुख्य प्रशासकीय इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मुख्य आवारात पेव्हरब्लॉक बसविण्यास झालेली दिरंगाई, वादग्रस्त ठरलेली संभाव्य नोकर भरती, हमाल मापारी यांची रद्द झालेली नोकरभरती,

कांद्याच्या लिलावात शेतकऱ्यांची होणारी लूट आदी बाबींचा विचार करता विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ न देता सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम घोषित करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिमन पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त खैरनार आदींनी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे, पावसाळ्यात लिलावाप्रसंगी शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता मुख्य आवारात पेव्हरब्लॉक बसविणे,

शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे, नळकस रस्त्यालगतच्या कांदा मार्केटमध्ये शेड बांधणे आदी कामांमध्ये दिरंगाई झाल्याने संचालक मंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

"कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी २० जूनला संपुष्टात आलेला आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील निवडणूकीस पात्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु कराव्यात असे आदेश असल्याने नामपूर बाजार समितीचे निवडणूकीसाठी सहाय्यक निबंधक, गटविकास अधिकारी यांच्याकडून मतदारांच्या याद्या मागवण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे."

-फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT