Record arrival of onion in market committee on Friday. esakal
नाशिक

Nashik Onion Rate: नामपूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 5 हजार 505 रुपयांचा सर्वोच्च भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात शुक्रवारी (ता. २७) एक हजार ६०० वाहनांमधून सुमारे २९ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

कांद्याने पहिल्यांदा पाच हजार ५०० चा टप्पा गाठला असून, गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याच्या भावात सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली. (Nampur Bazar Samiti Summer Onion highest price of 5505 nashik news)

उन्हाळ कांद्याला पाच हजार ५०० ते पाच हजार ५०५ रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च, चार हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे व उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली.

यंदा आठवड्याच्या सुरवातीपासून कांद्याचे भाव वधारल्याने येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. या तेजीमुळे शेतकरी समाधानी आहेत. यंदा पावसाअभावी लाल कांद्याची आवक सुमारे एक महिना उशिराने होणार असल्याने आगामी काळात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर टिकून राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

नामपूरला एक हजार ३२ वाहने, तर करंजाडला ५६७ वाहनांचे लिलाव करण्यात आले. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे. दरम्यान, लाल कांदा बाजारात आल्याने कांद्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहतील. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणावा.

लाल कांदा बाजारात न आल्यास उन्हाळ कांदा अजून उसळी घेईल. शेतकऱ्यांना फायदा मिळत असेल तर केंद्र सरकारने आडकाठी आणू नये, असे कांदा निर्यातदार शरद देवरे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पनवेल विधानसभा मतमोजणी, प्रशांत ठाकूर आघाडीवर

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT