Nampur Bajar Samiti : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सहकार प्राधिकरणाच्या जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नुकताच जाहीर केला आहे. ८ ऑक्टोबरला बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.
अचानक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
आजी-माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये रंगतदार निवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. (Nampur market committee election announced Nominations can be submitted till September 11 Nashik news)
सटाणा बाजार समितीचे विभाजन झाल्यानंतर २०१८ मध्ये नामपूर बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यात मोसम खोऱ्यातील ९३ गावांमधील सुमारे पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला होता.
परंतु यंदा पूर्वापार पद्धतीप्रमाणे सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांना मतदान करतील. २० जूनला संचालक मंडळाची मुदत संपल्याने नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी प्रशासकांची नेमणूक केली.
कामे रखडल्याने रोष
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे, पावसाळ्यात लिलावाप्रसंगी शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता मुख्य आवारात पेव्हरब्लॉक बसविणे, शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे, नळकस रस्त्यालगतच्या कांदा मार्केटमध्ये शेड बांधणे आदी कामांमध्ये दिरंगाई झाल्याने संचालक मंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, यासाठी तालुक्यातील एक राजकीय गट सक्रिय झाला होता.
संचालक मंडळाला स्थगिती
विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीस मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. संचालक मंडळास मिळालेल्या मुदतवाढीच्या विरोधात तांदूळवाडी (ता.बागलाण) येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश भामरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी न्यायाधीशांनी संचालक मंडळाच्या मुदतवाढीस स्थगिती दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके निवडणूकीचे कामकाज पाहणार आहेत.
शेतकऱ्यांकडून स्वागत
संचालक मंडळाची पाच वर्षांची कारकीर्द २० जूनला संपुष्टात आल्यानंतर सहकार विभागाने तातडीने मालेगाव येथील प्रथम श्रेणीचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती.
परंतु त्यानंतरच्या काळात संचालक मंडळाने ४ ऑगस्टला बाजार समितीचे सूत्रे ताब्यात घेतली. याविरोधात आकाश भामरे यांनी न्यायालयात दाद मागून संचालक मंडळाच्या कारभाराला पूर्णविराम दिला आहे. निवडणुकीच्या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निवडणुकीचे प्रमुख मुद्दे
बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मुख्य आवारात पेव्हरब्लॉक बसविण्यास झालेली दिरंगाई, वादग्रस्त ठरलेली संभाव्य नोकरभरती, हमाल मापारी यांची रद्द झालेली नोकरभरती आदी निवडणूकीचे मुद्दे राहतील.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
-उमेदवारी अर्ज दाखल करणे : ५ ते ११ सप्टेंबर
- अर्जांची छाननी करणे : १२ सप्टेंबर
- उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे : १३ सप्टेंबर
- माघारी घेणे : २७ सप्टेंबर
- चिन्ह वाटप करणे : २९ सप्टेंबर
- निवडणूक मतदान घेणे : ८ ऑक्टोबर
- मतमोजणी करणे : ९ ऑक्टोबर
सोसायटी/ग्रामपंचायत गटनिहाय जागा अशा
- सोसायटी गट : सर्वसाधारण ७ जागा, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती-जमाती १,
- ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण २ जागा, अनुसूचित जाती/जमाती १ जागा, आर्थिक दुर्बल घटक १
- व्यापारी गट : २ जागा
- हमाल/मापारी गट : १ जागा
- एकूण जागा : १८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.