Onion esakal
नाशिक

Nashik Onion Rate : नामपूर बाजार समितीत कांद्याला सर्वोच्च 5245 हजाराचा भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात दोन दिवसात सुमारे २७०० वाहनांमधून सुमारे ४८ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

कांद्याने पहिल्यांदा पाच हजारांचा टप्पा गाठला असून गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याच्या भावात सरासरी ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. (Nampur market committee onion get highest price of 5245 thousand nashik news )

उन्हाळ कांद्याला ४ हजार ५०० ते ५ हजार ५२४५ रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च, ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विटंल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. कांद्याच्या तेजीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली आहे.

नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर टिकून राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. दुसरीकडे कांद्याच्या दराने उसळी घेतली असली तरी काही मोजक्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळत आहे.

यापूर्वी हजारो शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने कांदा विकला आहे. भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक असल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नामपूरला गुरुवारी (ता.२६) ९६१ वाहने तर करंजाडला ४८५ वाहनांचे लिलाव करण्यात आले. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT