Ration card holders while presenting their complaints to District Supply Officer Ramesh Misal against the mismanagement of Fair Price Shop No. 3 here. esakal
नाशिक

Nashik News : नामपूरच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित; नियमानुसार धान्य वितरण न करणे भावले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नथुराम चौकातील रास्त भाव रेशन दुकान क्रमांक तीनमध्ये गैरकारभार विरुद्ध तपासणीत गंभीर दोषारोप आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना यांनी निलंबित केला आहे.

रेशन दुकानदार अनिल येवला यांच्या विरोधात इंदिरानगर येथील रहिवासी यांनी पालकमंत्री दादा भुसेंसह जिल्हा पुरवठा अधिकारी, बागलाणचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिल्यानंतर महसूल विभागाने तत्काळ ही कारवाई केली आहे. (Nampurs ration grain shop license suspended grain was not distributed as per rules Nashik News)

रेशन दुकानदार अनिल येवला हे ग्राहकांना शासकीय नियमानुसार धान्याचे वाटप न करता ग्राहकांशी गैरवर्तन करतात, अशा तक्रारी शासनाकडे नोंदविण्यात आल्या होत्या. इंदिरानगर येथील रहिवासी भगवान शिंदे, मंदाकिनी माळी, प्रवीण मोरे, सचिन राजगिरे, लक्ष्मीबाई पवार, पांडुरंग सोनवणे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे निवेदन सादर करून आपले गाऱ्हाणे मांडलं.

त्याअनुषंगाने झालेल्या तपासणीत गंभीर दोषारोप आढळल्याने जिल्हा पुरवठा शाखेने धान्य दुकान परवाना निलंबनाची कारवाई केली आहे.

परवानाधारक अनिल येवला यांनी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मदतनीस म्हणून आपले बंधू निळकंठ येवला यांची नियुक्ती केली आहे. नामपूर व मोराणे सांडस येथील दोन्ही रेशन दुकाने एकाच व्यक्तीच्या नावाने सुरू केल्याचे तपासणीत निदर्शनास आले.

सोबतच काही नियमांचे उल्लंघन झाल्याचेही दिसून आले. जिल्हा पुरवठा शाखेकडून तत्काळ या दुकानाचा परवाना रद्द करत नागरिकांची दुसरीकडे तात्पुरती सोय केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तपासणीत आढळलेले गंभीर दोषारोप असे :

- दुकानाची जागा पुरेशी नसल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता

- प्रत्यक्ष, ऑनलाइन साठा यात तफावत

- धान्याचे परवाना उपलब्ध नसणे

- विक्री केलेल्या वस्तूंचे हिशेब, नोंदणी पुस्तके, विवरण, पावत्या अपूर्ण

- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे दप्तर अपूर्ण

- दरमहा अन्न दिन साजरा न करणे

- अंत्योदय, प्राधान्य कुटुंबे लाभार्थ्यांची

नोंदवही न ठेवणे

- आधार क्रमांक नसलेल्या सदस्यांची नावे न वगळणे

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दुकानात न लावणे

- तक्रार नोंदविण्यासाठी संबंधित अधिकारी, पदनाम, भ्रमणध्वनी दर्शनी भागात न लावणे

"नामपूर येथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने सदर स्वस्त धान्य दुकानाच्या करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर दोषारोप आढळून आले आहेत. तपासणीवेळी कोणत्याही प्रकारचे अभिलेखा आढळून आले नाहीत. त्यामुळे अनिल येवला यांच्या प्राधिकार पत्रापोटी शासनाकडे जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सदर रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे."

-रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT