नांदगाव (जि. नाशिक) : प्रत्येक गावाला असणारा ऐतिहासिक ठेवा सांगणाऱ्या खाणाखुणा वाढत्या नागरीकरणात दृष्टीआड होत आहे. परंतु वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत एकीकडे नांदगावचे नागरिकरण निरनिराळ्या कारणांमुळे रखडून गेल्याने एकूणच सध्या शहरात बकालपणा आले आहे.
दुसरीकडे अनेक गावे आपल्या पुरातन ऐतिहासिक ठेवा जतन करीत असताना मात्र नगर पालिका कार्यालयाच्या हाकेवर असलेली जुनी गाववेस सध्या संकटात सापडलेली आहे. त्यामुळे पुरातन विभागाने शहराची ओळख असलेली ऐतिहासिक वेस लक्ष घात दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Nandgaon historical treasure Wes entry gate in danger Nashik News)
शहरातील वरची वेश म्हणून ओळख असलेली शिवकालीन पुरातन दगडी वेश शहराची शान आहे. शहरातील शिवस्फुर्ती मैदानावरील पुरातन वेशीच्या प्रवेशद्वारावर बाभळी उगवल्याने वेशीच्या डोक्यावर दगडाच्या भिंतीला तडे जाऊन काही दगड ढिले झाले आहे.
वेसीचे दगड निखळून पडत असल्याने येथे छोटे अपघात घडत आहे. या वेशीला तथा देवळी आकाराच्या कमानीला गेल्या अनेक वर्षात दुरुस्ती किंवा रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. तरीही गाववेस मजबुतीने डौलदारपणे मजबुतीने उभी आहे.
या वेशीचा भलामोठा सागवानी दरवाजा उघडलेल्या अवस्थेत फरताळासह त्याला लटकलेल्या पित्तळी कड्या साक्ष देतात. पण या पुरातन वेशीवर काटेरी बाभळीचा वेढा पडलेला असून दोन फूट आकाराचे खोड तयार झाले व त्या झाडाची वाढ सुमारे १५ ते २० फुट उंच झाली आहे. त्यामुळे या पुरातन वास्तूची जपणूक करणे काळाची गरज आहे.
या वेशीतून नागरिकांची कायम वर्दळ असते या ठिकाणी दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो .शहरातील सावित्रीबाई कन्या विद्यालय, व्ही.जे.हायस्कूल, छाजेड विद्यामंदिर, कमाका विद्यालय, जेटीके विदयालय येथील हजारो शाळकरी मुले, मुली याच वेशीतून ये-जा करतात.
अशी आहे वेस
नांदगावची ओळख असलेली ही ऐतिहासिक दगडीवेस सुमारे २० फूट उंच व दिसायला आर्कषक आहे. वेशीला मोठा सागवानी दरवाजा असून पितळी कड्या देखील आहे. वेशीच्या वरच्या दोन्ही बाजूला दोन दगडीमूर्तीचे सिंहाचे छावे बसवलेले आहे.
"शहराची ओळख असलेली वेस याची आत्ताची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. वेशीवर बाभळी उगविल्याने वेशीला तडे पडले आहे. वेशीचे दगड मोकळे झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने वेस दुरुस्ती करून पुरातन वारसा जपावा."
- डॉ. यशवंत गायकवाड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.