नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या नाना तऱ्हा दिवसेंदिवस उघड होत आहेत, त्यात आता तर थेट प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी घटन उघडकीस आली आहे. नाशिकहून नंदुरबारच्या दिशेने निघालेल्या बसच्या मागील एक चाकाचे केवळ दोन नटबोल्ट असताना ती ट्रॅक्टर हाऊसपर्यंत धावली.
विशेषत: ही बाब चालकाला माहिती असतानाही त्याने बसमधील ३५ प्रवाशांच्या जीव धोक्यात घातला. (Nandurbar bus ran on only 2 nutbolts Bolt bought by driver inexcusable neglect of MSRTC corporation Nashik News)
नाशिक - नंदूरबार ही बस (एमएच ४० एन ९६२४) जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावरून गुरुवारी (ता. १६) दुपारी पावणे दोनच्या सुमारास नंदुरबारच्या दिशेने मार्गस्थ झाली. तिच्याच ३५ प्रवासी प्रवास होते. बसस्थानक सोडल्यानंतर ती बस गडकरी चौक मार्गे द्वारका चौफुली ओलांडून महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या टॅक्टर हाऊसजवळ थांबली.
चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि उतरला. २० मिनिटे होऊनही बस जागची हलेना म्हणून प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली. वाहकही खाली उतरलेला होता. बसमध्ये बिघाड झाला की काय म्हणून काही प्रवासी खाली उतरले.
त्यावेळी बसमधील एका सुजाण प्रवाशाने वाहकाकडे चौकशी केली असता, त्याने जे काही सांगितले त्यामुळे तो प्रवासीच नव्हे तर सारेच प्रवासी अवाक् झाले.
या बसच्या डाव्या बाजूकडील मागील चाकाला आठ नटबोल्टपैकी फक्त दोनच नटबोल्ट होते. या दोनच नटबोल्टवर ही बस सीबीएसपासून ट्रॅक्टर हाऊसपर्यंत गर्दी व रहदारीच्या रस्त्यावरून धावली होती. विशेषत: ही बाब वाहक-चालकांना ठाऊक होती.
त्यामुळे चालक ट्रॅक्टर हाऊस परिसरात नटबोल्ट खरेदी करण्यासाठी गेल्याचे वाहक साबळे यांनी सांगितल्यावर नागरिकांनी डोक्याला हात मारून घेतला. बसचालकाने नवीन नटबोल्ट आणले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
ते बसच्या डाव्या बाजूकडील मागच्या चाकाला बसविले. त्यानंतर ही बस नंदूरबारच्या दिशेने मार्गस्थ झाली. बसच्या मार्गाची (विंचूर-प्रकाशा) दुरवस्था झाली असून, वाहनांचा मोठ्या प्रमाणात घसारा होत असल्याचे चालकाने सांगितले.
ही बस ज्या कंपनीची आहे, त्याचे नटबोल्ट नाशिक आगाराच्या दुरुस्ती विभागात उपलब्ध नसल्याचीही बाब यामुळे स्पष्ट झाली. त्यामुळेच चालकाला नवीन नटबोल्ट खेरदी करावे लागले.
काही अनुत्तरित प्रश्न
नंदूरबारहून येतानाच नटबोल्ट निघाले की नाशिकमध्ये? बस आगाराच्या दुरूस्ती विभागात का नेली नाही? राहिलेले दोन नटबोल्टही तुटले असते तर असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ता रहदारीचा आणि गर्दीचा होता.
बसचे चाक निखळले असते तर बस पलटी होण्याची वा लोकवस्तीमध्येही शिरण्याची शक्यता होती. परंतु बसमधील सर्वांचेच दैव बलवत्तर म्हणावे लागेल. बस ट्रॅक्टर हाऊसपर्यंत पोहोचली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.