Bharat Ratna Dr. MLA Narendra Darade, Sarpanch Jaydutt Holkar, Deputy Sarpanch Ramnath She, Prakash Patil while greeting Babasaheb Ambedkar. esakal
नाशिक

Dr. Ambedkar Jayanti : अहिंसा, राज्यघटनेशिवाय प्रगती अशक्य : नरेंद्र दराडे

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे विचार हे परिसारखे आहेत जो ते ग्रहण करेल त्याच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. गौतम बुद्धांची अहिंसा अन्‌ बाबासाहेबांची राज्यघटना प्रत्येक नागरिकांनी अंगिकारल्याशिवाय देशाची प्रगती होणे अशक्य आहे असे मत आमदार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले.

लासलगाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात निळ्याशार पताका, निळे ध्वज, रोषणाईत न्हाऊन निघाले. जयंती उत्सवाचा अनोखा उत्साह नागरिकांमध्ये दिसून आला. (Narendra Darade statement on Dr Ambedkar Jayanti nashik news)

डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहाला सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय आदींसह सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली. लासलगाव शहरातील वरदहस्त व श्रीराम सेना ढोल ताशाच्या पथकाने वाद्यवृंदाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना केली.

यशोधरा व महिला मंडळातर्फे भीमज्योत पुतळ्याजवळ आणण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जयदत्त होळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे आयुष्य आपल्या सर्वांचेच आयुष्य सुखकर होण्यासाठी अतोनात पराकाष्ठा केली. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाड सत्याग्रह या सत्याग्रहाच्या माध्यमातून देशामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणली. सूत्रसंचालन डॉ. अमोल शेजवळ यांनी केले.

शिवा सुरासे, प्रकाश पाटील, डॉ. सुजित गुंजाळ, रामनाथ शेजवळ, मधुकर गावडे, सचिन होळकर, डॉ. विलास कांगणे, राजेंद्र चाफेकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल पवार, कैलास केदारे, आरती भालेराव, संगीता शेजवळ, तुळसाबाई शेजवळ, रूपाली केदारे, माया केदारे, छाया जाधव, यशोधरा व रमाई महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT