government bank esakal
नाशिक

Government Banks: कर्जवितरणाबाबत राष्ट्रीयकृत बँका उदासीन : नरेंद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा

Government Banks : देशात युवकांमध्ये उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज वितरण केले जाते. मात्र यात राष्ट्रीयकृत बँका उदासीन आहेत. १६ हजार ६२६ पैकी ५७५९ उमेदवारांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी स्वीकारले.

बॅकांच्या प्रतिनिधीची आज बैठक असताना पाच बॅकांच्या प्रतिनिधींनी दांडी मारली. त्यामुळे जिल्हाधिकारी संबंधित बॅकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. (Narendra Patil statement Nationalized banks indifferent to disbursement of loans nashik news)

श्री. पाटील यांनी आज राष्ट्रीयकृत बॅकांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्यासह जिल्हातील बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर श्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, मराठा समाजाच्या युवकांमध्ये उद्योजक घडविण्यासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे एक लाख उद्योजक उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ६० हजाराच्या आसपास उद्योजकांना कर्ज उभारणीतून मदत करण्यात आली.

मात्र चाळीस हजाराच्या आसपास उद्दिष्ट बाकी आहे. यात बॅकांनी सामाजिक हेतूने पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतीपूरक, उत्पादन, सेवा, व्यवसाय, अन्न प्रक्रिया अशा सगळ्याच क्षेत्रासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा आहे.

तूर्तास वाहनासाठी कर्जाला जास्त प्राधान्य दिले जाते. एका मोठ्या उद्योजकाला कर्ज देण्याऐवजी अनेक लहान लहान नवतरुणांना कर्ज देण्याने नवीन लहान लहान उद्योजक तयार होतील ही या मागची भूमिका आहे. त्यासाठी आज बॅकांच्या प्रतिनिधींना आवाहन करण्यात आले.

सकारात्मक प्रतिसाद

इंडस्ट्रिअल बॅकेसह नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅक अशा तीन बॅकांनी उदिष्ट्यापेक्षा अधिक प्रकरणे मंजूर केली.

मात्र अजूनही बेरोजगार युवकांच्या कर्ज प्रकरणाचे साधी नोंदवही अनेक बॅकात ठेवली जात नाही. त्यामुळे मागील आणि यंदाचे असे एकत्रित उद्दिष्ट साध्य व्हावे अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जुलैपासून उत्पादकांकडून ट्रॅक्टर

कर्ज प्रकरणात ट्रॅक्टर विक्रीत मध्यस्थ डिलर आणि वितरकांचा खर्च कमी करण्यासाठी शासनस्तरावरून थेट ट्रॅक्टर उत्पादकांशी संपर्क साधून थेट शेतकऱ्यांना कंपनी खर्चात ट्रॅक्टर्स देण्याचे नियोजन आहे.

साधारण जुलै महिन्यापासून असा करार अस्तित्वात येऊ शकतो. एका कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. इतरही कंपन्यांच्या शासन संपर्कात आहे. खासगी बँकांकडून १४ ते १६ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते, त्यात कपात व्हावी असेही प्रयत्न सुरु आहेत.

त्यासाठी बँकांना आवाहन करण्यात आले आहे. हिंदी भाषक बॅक व्यवस्थापकांना योजना लक्षात यावी म्हणून हिंदी आणि इंग्रजीतून महामंडळाच्या योजनांचे पत्रक बँकांना वितरित केली जाणार आहे.

पाच वर्षातील स्थिती

प्रमुख बँका कर्ज उद्दिष्ट प्रत्यक्षात वितरण

बडोदा बॅक १५४२ ३८

बॅक आॅफ इंडिया ७०८ ४६

महाराष्ट्र बॅक २४३० ८२

कॅनरा बॅक ५४६ ४८

सेंट्रल बॅक ५९८ ०८

इंडियन बॅक (अलाहाबाद) १५६ ०५

ओव्हरसिज बॅक १२६ ११

पंजाब सिंध बॅक ३० ००

पंजाब नॅशनल बॅक ५३४ १९

स्टेट बॅक २५९६ २४

इंडस्ट्रीअल बॅक २२५ १०३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT