Voting esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : आहे ग्रॅज्युएट, तरी मतदान येत नाही!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरुवारी (ता.२) नाशिकमध्ये सुरवात झाली. हळूहळू फेऱ्यांमधून आकडेवारी समोर येऊ लागली. पण जसजशी आकडेवारी समोर येत होती, तसतशी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाची लाट ओसांडत होती.

हे सर्व काही सुरू असताना समोर आलेल्या आकडेवारीवरून सामान्यांमध्ये अवैध मतांवरून कुजबूज सुरू झाली. कारण मोठ्या प्रमाणावर मतपत्रिका अवैध ठरत होत्या. ग्रॅज्युएट असूनही यांना मतदान करता येत नाही, किती मत बाद झाली, या चर्चांनी मात्र निकाल लागल्यानंतरही जोर धरला होता. (Narosankarachi ghanta Graduates not aware about voting at nashik graduate election news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

उत्साह अतिउत्साही कार्यकर्त्यांचा

पदवीधर निवडणुकीत नाशिक विभागाची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरली. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीपासून ते शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर त्यांना भेटण्याचा केलेला प्रयत्न. अशी एकूण निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीपर्यंत अधिक रंगतदार होताना दिसत आहे.

या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली होती. गुरुवारी (ता. २) मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली खरी. पण मतमोजणीसाठी उशीर होत असला तरी मतमोजणीपूर्वीच केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. त्यांच्या जल्लोषामुळे काही माध्यमांमध्ये निकालापूर्वीच आघाडी-पिछाडीच्या चर्चा रंगू लागल्या.

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंच्या मूळ गावी म्हणजेच संगमनेरमध्ये तर निकालाआधीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, तसे बॅनरही झळकले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला. नंतर आघाडीमुळे हे बॅनर लावल्याचे समजल्याने कार्यकर्ते आणखी उत्साहाने नाचू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT