Ravindra Nimse, President of Grape Growers Union, and colleagues felicitating Police Inspector Arun Dhanwade for getting the money for the grape crop. esakal
नाशिक

Nashik News : थकलेले 1 कोटी 2 लाख रुपये मिळवून दिल्याने पोलिस निरीक्षक धनवडे यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गतवर्षाच्या द्राक्ष हंगामात १८ द्राक्षबागाईतदार शेतकऱ्यांनी त्यांचे परिपक्व द्राक्ष इगतपुरीतील वायनरीजला दिले होते. त्या द्राक्षाचे पैसे देण्यात वायनरीजतर्फे टाळाटाळ केली जात होती. परंतु ओझर पोलिसांनी सतत पाठ पुरावा करून कडक समज देऊन पोलिसी ट्रिक्स देताच वायनरीने सर्व शेतकऱ्यांचे थकवलेले १ कोटी २३ लाख रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. (Nashik News)

यामुळे द्राक्ष बागाईतदार संघातर्फे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचा सत्कार करण्यात आला. सन २०२३ च्या द्राक्ष हंगामात निफाड, सिन्नर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यांतील सुमारे १८ द्राक्ष पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेले द्राक्ष पीक वायनरीजला दिले होते. परंतु ठरल्याप्रमाणे कंपनीने ३ महिन्यांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत.

आज-उद्या करत वायनरीजने चालढकल केली. शेवटी वैतागून सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष बागाईतदार संघ पुणे (नाशिक विभाग) यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारीवरून द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी ओझर पोलिस स्टेशनला वायनरीज विरुद्ध तक्रार अर्ज दिला. (latest marathi news)

द्राक्ष बागाईतदार संघाकडून प्राप्त तक्रारीनुसार ग्रोवर झांपा वायनरीज, इगतपुरी यांनी थकविलेली शेतकऱ्यांची रक्कम रुपये १ कोटी २३ लाख रुपयांसाठी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे रायटर हवालदार विश्वनाथ धारबळे यांनी वायनरीजच्या संचालकांना फसवणुकीबाबत गुन्हा दाखलची नोटीस दिली.

तसेच केलेल्या पाठपुराव्यामुळे कंपनीने शेवटी सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नुकतीच जमा केली. त्यानिमित्त तक्रारदार रवींद्र निमसे, अध्यक्ष द्राक्ष बागाईतदार संघ यांनी ओझर पोलिस ठाण्यात येऊन पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण व पोलिस निरीक्षक धनवडे यांच्यासह स्टाफचे आभार मानत सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT