rakhi  esakal
नाशिक

Nashik News : सीमेवरील जवानांनासाठी यंदा 1 लाख राख्या पाठविणार!

Nashik News : गेल्या नऊ वर्षापासून जवानांना राख्या पाठवण्याचा उपक्रम बडोदे येथे कार्यरत असलेले लखमापूरचे भूमिपुत्र, अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळ समितीचे सदस्य प्रा. संजय बच्छाव राबवत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सुनील खैरनार : सकाळ वृत्तसेवा

लखमापूर : सीमेवर चोविस तास तैनात जवानांचा रक्षाबंधन सण साजरा व्हावा म्हणून गेल्या नऊ वर्षापासून जवानांना राख्या पाठवण्याचा उपक्रम बडोदे येथे कार्यरत असलेले लखमापूरचे भूमिपुत्र, अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळ समितीचे सदस्य प्रा. संजय बच्छाव राबवत आहेत. यंदाही त्यांनी यासाठी राख्या पाठविण्याचे आवाहन केले आहे. (1 lakh rakshasa will be sent to soldiers on border this year)

२०१५ मध्ये ५००० राख्यांपासून सुरू होत गेल्यावर्षी सीमेवरील जवानांना ५५ हजार राख्या पाठवण्यात आल्या. प्रतिकूल उणे तापमानात द्रास, कारगिल, बटालिक, सियाचीन, गलवान खोऱ्यातील जवानांना राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. या उपक्रमात १४ राज्यातील महाराष्ट्र व गुजरातच्या ४० शहरातील माताभगिनींकडून राख्या प्राप्त झाल्या होत्या. यंदा एक लाख राख्या पाठविण्याचे नियोजन आयोजकांची ठरवले आहे.

या उपक्रमामध्ये जगातील कोणतीही व्यक्ती सहभाग घेऊ शकते. या उपक्रमात भाग घेण्यासाठी २० जुलैच्या आत दिलेल्या पत्त्यावर राख्या पाठवणे बंधनकारक आहे. २१ जुलैला राख्यांचे वर्गीकरण व पूजन केले जाणार आहे. २२ जुलैला राख्या सीमेवर पाठवल्या जाणार आहेत असे आयोजक संजय बच्छाव (९४२८१६५५९६) यांनी कळविले आहे. (latest marathi news)

राखी संकलन केंद्राचा पत्ता असा ः संजय बच्छाव, मुख्य प्रवेशद्वार, बरोडा हायस्कूल बग्गीखाना, पोलो ग्राउंडसमोर, बडोदे, गुजरात दरम्यान श्री. बच्छाव यांच्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे वेळोवेळी गुजरात सरकार व माध्यमांकडून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे

"देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांसाठी आपण वेगळं काही करू शकत नाही, परंतु सण समारंभामध्ये जवानांबरोबर सामील होऊ शकतो. रक्षाबंधन प्रत्येक भावासाठी विशेष सण असतो. प्रत्येक भारतीयांची शुभेच्छा राखीच्या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सर्व भारतीयांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत." - प्रा. संजय बच्छाव, अखिल भारतीय साहित्य संमेलन समिती सदस्य, बडोदे, गुजरात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT