Nashik Lok Adalat : कौटुंबिक कलहातून तर कधी गैरसमजातून दांपत्यातील वाद न्यायालयाच्या दारात पोचतात. मात्र, लोकअदालतीमध्ये आलेल्या तडजोडीसाठी आलेल्या १०३ दांपत्यामध्ये न्यायालयाने दिलजमाई करीत त्यांच्या सुखी संसाराचा गाडा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे दोन्ही पक्षाकडील २०३ कुटुंबीय आनंदाच्या उत्साहात घरी परतली. तर, मोटार वाहन अपघाताच्या ३४३ प्रकरणे निकाली काढून २४ कोटी ३९ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. (103 couple consolation due to Lok Adalat )
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधीकरण व नाशिक जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. या वेळी दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १ लाख २५ हजार ६२९ प्रकरणे ठेवण्यात आली असता, १० हजार ३१० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ९ कोटी ७८ लाख ८५ हजार २७९ रुपयांची वसुली करण्यात आली.
तर, प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणे असे एकूण १३ हजार ४९६ प्रकरणांचा निपटारा लोकअदालतीत करण्यात आला. तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये १३९ कोटी ९७ लाख ८७ हजार ११३ रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. अदालतीमध्ये मोटार अपघाताची ११७२ पैकी ३४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर, अपघातांमध्ये मयत झालेल्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाईची २४ कोटी ३९ लाख १२ हजार ५१२ रुपयांची रक्कम यावेळी देण्यात आली.
मोटार अपघाताच्या एका प्रकरणात ट्रक चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली असता, पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यास जिल्हा न्यायाधीश यु.जे. मोरे यांच्या मध्यस्थीने साडेनऊ लाखांची भरपाई दिली. यावेळी ॲड. अष्टपुत्रे, ॲड. एम.टी.क्यु. सय्यद यांनी मध्यस्थी केली. त्याचप्रमाणे, नाशिकरोड मोटार वाहन न्यायालयातील १५५५ प्रकरणांपैकी १३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीचे संयोजन प्राधिकरणाचे सचिव मिलिंद बुराडे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह सर्व अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केले. (latest marathi news)
पीडितांना १ कोटी ४३ लाख
२०१५ मधील अपघातप्रकरणात पीडितांना १ कोटी ३२ लाख देण्याचे आदेशित केलेले होते. त्यासंदर्भात २०१९ मध्ये प्रकरण पुन्हा न्यायालयात आले असता, त्यावर लोकअदालतीने व्याजासह १ कोटी ४३ लाखांची भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेशित केले. त्यानुसार सदरची रक्कम पीडितांना देण्यात आली.
प्रकरणे - निकाली
धनादेश न वटणे- १२७९
मोटार अपघात - ४३३
कौटुंबिक वाद- १०३
फौजदारी तडजोड- ३५३
अन्य - १०८३
कामगार विषयक- २५
एकूण - ३१८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.