Nashik 11th Admission : तब्बल पाच प्रवेशफेऱ्या पार पडल्यावर इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशासाठी राबविलेल्या या प्रक्रियेत १६ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, यानंतरही १० हजार ४२७ जागा रिक्त आहेत. विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेशासाठीच चढाओढ पाहायला मिळाली आहे. (nashik 11th admission 10 thousand 427 seats are vacant news)
नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या पार पडलेल्या आहेत. एकूण उपलब्ध जागांपैकी सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या होत्या; तर सर्वाधिक प्रवेशही विज्ञान शाखेत झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे.
त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेच्या प्रवेशाला प्रतिसाद मिळाला असून, कला शाखेतील एकूण जागांपैकी सुमारे ४३ टक्के जागा रिक्त राहिलेल्या आहेत. यापुढील टप्प्यांत पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि केटीकेटी सूत्रानुसार पात्र विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. यातून एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी किरकोळ प्रमाणात वाढ होणार आहे.
इंग्रजी माध्यमाचा बोलबाला...
इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये महाविद्यालयात जागा उपलब्ध होत्या. इंग्रजी माध्यमाच्या उपलब्ध १७ हजार ४४० जागांपैकी ११ हजार ७२ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, सहा हजार ३६८ जागा रिक्त आहेत; तर मराठी माध्यमाच्या नऊ हजार ५२० जागांवर पाच हजार ५९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, उर्वरित तीन हजार ९३० जागा रिक्त आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शाखानिहाय प्रवेशाची स्थिती अशी ः
शाखा एकूण जागा प्रवेश घेतलेले विद्यार्थी
विज्ञान ११,६०० ७,९५०
वाणिज्य ९,३३० ५,६१७
कला ५,२७० ३,०१४
आकडे बोलतात...
* कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या- ६६
* उपलब्ध असलेल्या जागा- २७ हजार ३६०
* प्रवेशासाठी नोंदणीकृत विद्यार्थी- २३ हजार ०९२
* प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी- १६ हजार ९३३
* रिक्त जागांची संख्या- १० हजार ४२६
* प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या- ६ हजार १५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.