Nashik 11th Admission 16 thousand students registration for first round news esakal
नाशिक

Nashik 11th Admission : 16 हजार विद्यार्थ्यांची पहिल्‍या फेरीसाठी नोंदणी; सहभागी विद्यार्थ्यांची संख्या कमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविल्‍या जात असलेल्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाअंतर्गत शनिवारी (ता. १७) अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत संपली. (Nashik 11th Admission 16 thousand students registration for first round news)

२२ हजार ०४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असली तरी पहिल्‍या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ०५० आहे. उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.

शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने राबविली जाते आहे. गुणपत्रिकांचे वितरण व अपूर्ण अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांना संधी देण्याच्‍या उद्देशाने नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली होती. त्‍यानुसार अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत शनिवारी संपली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वाढीव मुदतीत आत्तापर्यंत एकूण २२ हजार ०४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी १६ हजार ०५० विद्यार्थ्यांनी पहिल्‍या नियमित प्रवेश फेरीसाठी नोंदणी केली. एक हजार ३८० विद्यार्थ्यांनी कोट्यासाठीच्‍या जागांवर प्रवेशासाठी अर्ज केलेला आहे.

यापैकी ६६२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत. दरम्‍यान, प्रवेश फेरीसाठी २२ हजार २९४ जागा उपलब्‍ध असताना जेमतेम सोळा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. असे असले तरी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी चुरस बघायला मिळणार आहे. विशेषतः नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पहिल्‍या फेरीतील कटऑफ नव्वद टक्क्यांहून अधिक राहाण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी यादी जाहीर होणार

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार पुढील दोन दिवस माहिती विश्‍लेषण प्रक्रियेसाठी राखीव ठेवलेले आहेत. तर पहिल्‍या नियमित फेरीसाठी गुणवत्ता यादी येत्‍या बुधवारी (ता. २१) प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २४ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT