Child Malnutrition Free  esakal
नाशिक

Nashik Child Malnutrition News : सुरगाणा तालुक्यात 13 बालके कुपोषणमुक्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी राबविण्यात आलेल्या सुरगाणा पॅटर्नचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. या उपक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्यातील ३४ तीव्र कुपोषित बालकांना कोंबड्या देण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे ३४ तीव्र कुपोषित बालकांपैकी २१ बालके ही मध्यम कुपोषित बालक श्रेणीत गेली व १३ बालके ही सर्वसामान्य श्रेणीत गेली आहेत. (13 children free from malnutrition in Surgana taluka)

जिल्ह्यात अतिगंभीर कुपोषित आणि मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पौष्टिक आहार मिळत नसल्याने बालके कुपोषित होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्या देऊन त्या माध्यमातून बालकांना अंडी मिळावीत, या उद्देशाने पालकांना कोंबड्या देण्याचा फेब्रुवारीत निर्णय झाला होता.

या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी कोंबड्या देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. कोंबड्यांबरोबरच त्या कोंबडीच्या वाढीसाठी लागणारे खाद्यही जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पुरविण्यात आले होते.

वीस आठवड्यांचे खाद्य पुरविले गेले. त्याचबरोबर आयआयटी मुंबईतर्फे कुपोषित बालकांच्या मातांना प्रभावी स्तनपानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचे परिणाम आता दिसून आले आहेत. उपक्रमामुळे ३४ तीव्र कुपोषित बालकांपैकी २१ बालके ही मध्यम कुपोषित बालक श्रेणीत गेली. १३ बालके ही सर्वसामान्य श्रेणीत गेली. त्यामुळे महिला व बालविकास विभाग आणि पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. (latest marathi news)

प्रकल्पनिहाय ॲक्शन प्लॅन करावा

पावसाळा सुरू झाल्यावर कुपोषित बालकांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आतापासूनच कुपोषणावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मित्तल यांनी प्रकल्प बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उन्हाळा संपला असून, आता पावसाळा सुरू होणार आहे.

साधारण जुलै- ऑगस्टमध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढते, असे निदर्शनास येत असल्याने आतापासून कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तीव्र कुपोषित बालकांच्या तयार करण्यात आलेल्या प्रोफाइलवर चर्चा झाली. दर महिन्याला या बालकांचे प्रोफाइल अपडेट करण्यात यावे, तीव्र कुपोषित बालकांसाठी विविध विभागांच्या समन्वयातून त्यांचे वजन सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी प्रकल्पनिहाय ॲक्शन प्लॅन तयार करावा.

अशा सूचना मित्तल यांनी या वेळी दिल्या. आयआयटी मुंबईतर्फे देण्यात आलेले प्रशिक्षण मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात यावे, प्रशिक्षित अंगणवाडीसेविका यांच्याकडून गृहभेटीवेळी स्तनपानाच्या विशेष पद्धती, पूरक पोषण आहार याबाबत कुपोषित बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना या वेळी त्यांनी दिल्या. या वेळी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह सर्व प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT