Crop Insurance esakal
नाशिक

Crop Insurance : शेतकऱ्यांना चार वर्षांत 13 टक्के विमा भरपाई; शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्‍वास उडाला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊनही प्रत्यक्षात पदरात काहीच पडलेले नाही. कृषी विभागाने २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत विमा कंपन्यांकडे एक हजार ५५ कोटींची मागणी केलेली असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत अवघे १३९ कोटी (१३.१७ टक्के) रुपये मिळाले आहेत. (13 percent insurance compensation to farmers in four years)

गेल्या वर्षी दुष्काळामुळे खरीप व रब्बी हे दोन्हीही हंगाम वाया जाऊनही विमा कंपन्यांकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा या कंपन्यांवरील विश्‍वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. वर्षभराचे उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करून पीक घेतात. मात्र, कधी गारपीट, अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळामुळे त्याचे नुकसान होते.

शेतकऱ्यांना अशी अडचणीच्या काळात थोड्याफार प्रमाणात मदत मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली. पीकनिहाय विम्याचा एकरकमी हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जायचा; परंतु राज्य सरकारने पीकविमा धोरणात बदल करून अवघ्या एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख ८१ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपनीने गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत २५ टक्के भरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. उर्वरित रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. साधरणत: १८१ कोटींची मागणी पीकविमा कंपनीकडे करण्यात आली आहे. (latest marathi news)

त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागील पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढूनही यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले आहे. भरपाईची रक्कम कमी करावी, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कंपनी प्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत त्याच पद्धतीने पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसह शासनालाही ‘चुना’ लावल्याचे मदतीच्या आकडेवारीतून सिद्ध होते. आताही त्याच दृष्टीने वाटचाल सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काय पडेल, हे आता काही सांगणे अवघड झाले आहे.

दहा लाख शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे २०२१ पासून मार्च २०२४ पर्यंत सुमारे दहा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार ६२४ हेक्टरवरील पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासनस्तरावरून काही प्रमाणात मदत होते; परंतु शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून मदतीची अपेक्षा लागून असते.

वर्षनिहाय बाधित शेतकरी व रक्कम प्राप्त तपशील

वर्ष................शेतकरी..........रक्कम.................प्राप्त

२०२१-२२...१४१०७३...३३७ कोटी ५९ लाख..३७ कोटी ७८ लाख

रब्बी..............६०१६....२६ कोटी ८३ लाख.....शून्य

२०२२-२३..१६५०६०...४५८ कोटी ९० लाख...२२ कोटी ६० लाख

रब्बी..............४६९८....२५ कोटी ८६ लाख....शून्य

२०२३-२४...५८१९०२....१८१ कोटी ५३ लाख.....७९ कोटी

रब्बी...........१००५१९.....२५ कोटी ८ लाख........शून्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT