anganwadi esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 132 अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत! बिगरआदिवासींत 64, तर आदिवासी भागात 67 अंगणवाड्या मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी मिळणारा निधी खर्च न झाल्याने जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे दायित्व गेल्याने बिगरआदिवासी भागातील तालुक्यांमध्ये एकही नवीन अंगणवाडीचे बांधकाम झाले नाही. यंदा विभागांतर्गत केलेल्या नियोजनात बिगरआदिवासी तालुक्यांमध्ये ६४, तर आदिवासी तालुक्यांमध्ये ६७ अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी २३ कोटी ५५ लाखांचा निधी मिळाला आहे. (132 Anganwadis in district will get roof)

ग्रामीण भागात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अंगणवाड्या करतात. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्यात सुमारे पाच हजार २८५ अंगणवाड्या आहेत. यात आदिवासी क्षेत्रात दोन हजार ३१९, तर बिगरआदिवासी क्षेत्रात दोन हजार ९६६ अंगणवाड्या आहेत.

यापैकी चार हजार १९७ अंगणवाड्या शासकीय इमारतीत भरतात. अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्याने तब्बल ७५० अंगणवाड्या खासगी जागेत आहेत. इमारती अथवा स्वतःची जागा नसल्याने अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. मागील वर्षी अंगणवाडी बांधकामासाठी बिगरआदिवासी तालुक्यांना निधी मिळाला नव्हता. पावसाळ्यात अंगणवाडीला इमारत नसल्याने बालकांचे हाल झाले.

यामुळे अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी निधी मिळावा, अशी मागणी झाली होती. त्याची राज्य शासनाने दखल घेत विचारणा केली होती. यंदा नियोजनात जिल्हा नियोजन समितीकडून आदिवासी व बिगरआदिवासींसाठी निधी मिळाला असून, महिला व बालकल्याण विभागाने त्यांचे नियोजन केले आहे. या नियोजनातून १३२ अंगणवाड्यांना इमारत मिळणार आहे. (latest marathi news)

अंगणवाड्यांचा निधी

बिगरआदिवासी (सर्वसाधारण क्षेत्र) ६४ ११.२५ कोटी

आदिवासी क्षेत्र ६७ १२.३० कोटी

मंजूर कामे

तालुका आदिवासी क्षेत्र बिगरआदिवासी क्षेत्र

पेठ ५ -

त्र्यंबकेश्वर ४ -

दिंडोरी - -

इगतपुरी ६ ३

नाशिक - -

सिन्नर - ८

सुरगाणा ३७ -

कळवण ३ -

देवळा - १

बागलाण - ७

मालेगाव - १२

निफाड - १२

येवला - ७

नांदगाव - ७

चांदवड - ७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

SCROLL FOR NEXT