Loan  esakal
नाशिक

Nashik News : लघु उद्योजकांना 1346 कोटींचे ‘मुद्रा लोन’; कर्जमर्यादा दुप्पट झाल्याने योजनेची व्याप्ती वाढणार

Nashik News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची मर्यादा दहा लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची मर्यादा दहा लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवली आहे. या योजनेंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दीड लाख व्यक्तींनी १३४६ कोटींचे कर्ज घेतले आहे. योजनेची व्याप्ती वाढविल्याने कर्जदारांचे प्रमाण वाढण्यास निश्‍चितपणे हातभार लागणार आहे. (1346 Crore Mudra Loan to Small Entrepreneurs)

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण व्यक्तींना लघु उद्योग उभारण्यासाठी ५० हजार ते दहा लाखापर्यंत बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. कर्जाची दहा लाखांची कमाल मर्यादा केंद्र सरकारने आता २० लाख म्हणजे दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी शिशू प्रवर्गातील अर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते.

या योजनेचा जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ८७२ व्यक्तींनी लाभ घेतला असून त्यांना ४०३ कोटींचे कर्ज बँकांनी वितरित केले. किशोर गटासाठी ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. यात जिल्ह्यातील ३७ हजार ९३९ व्यक्तींनी ४७५ रुपयांचे कर्ज घेतले आहे. तरुण गटात ५२६१ कर्जदारांनी ४६८ कोटी रुपये कर्ज घेतले असून त्यांना दहा लाखापर्यंत कर्ज मिळते.या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांनी २६ हजार ८५६ व्यक्तींना ४१६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. खासगी बँकांनी ९९ हजार ५२५ व्यक्तींना ६९५ कोटींचे कर्ज दिले. कर्ज वितरणात स्मॉल फायनान्स बँकांचा वाटा कमी दिसत असला तरी कर्जदारांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यांनी ३१ हजार ४५८ व्यक्तींना २२६ कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. मुद्रा योजनेच्या मर्यादेत दुपटीने वाढ झाल्यामुळे नवउद्योजकांच्या पंखांना अजून बळ मिळणार आहे. (latest marathi news)

मध्यस्थांची गरज नाही

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवताना कुठल्याही मध्यस्थीची आवश्‍यकता नसते. अर्जदाराला स्वत:चे आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, लाईट बिल आदी कागदपत्रांची पुर्तता करून सहजपणे अर्ज करता येतो. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँकाही हे कर्ज मंजूर करू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अर्जदारांकडून व्याज आकारले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची स्थिती

प्रकार.......लाभार्थी.......कर्ज (कोटी रु.).......कर्जाची मर्यादा

शिशू........११३८७२.......४०३................५० हजार रु.

किशोर......३७९३९........४७५.................५० हजार ते ५ लाख रु.

तरुण.........६२६१.........४६८................५ लाख ते १० लाख रु.

एकूण.........१५८०७२....१३४६

बँकांनी वितरीत केलेले कर्ज

बँका......................लाभार्थी.......कर्ज (कोटी रु.)

सार्वजनिक बँका.........२६८५६......४१६

खासगी बँका..............९९५२५......६९५

स्मॉल फायनान्स बँका....३१४५८.....२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

SCROLL FOR NEXT