Accident Prone Areas esakal
नाशिक

Nashik Accident Prone Areas: जिल्ह्यात 139 अपघात प्रवण क्षेत्रे! उपाययोजनांचा आढावा सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident Prone Areas : अपघात प्रणव क्षेत्रात काय उपाययोजना करण्यात आल्या, याविषयीचा मागील तीन वर्षांचा आढावा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. जिल्ह्यात १४६ ब्लॅक स्पॉट आणि १३९ अपघात घडण्याची शक्यता असलेली ठिकाणे आहेत. (139 accident prone areas in district)

जिल्हाधिकारी कार्यालयात अपघाताच्या ठिकाणांबाबत मंगळवारी (ता. २४) आढावा बैठक घेण्यात आली. महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार शहरालगतच्या ब्लॅक स्पॉटवर त्रिस्तरीय पाहणी केली होती. त्यात प्रामुख्याने पीडब्ल्यूडी, पोलिस, आरटीओ, महापालिका यांनी विशेष पाहणी केली होती.

प्रत्यक्षात या ठिकाणांवर शॉर्ट टर्म उपाययोजना करण्याचे काम करण्यात आले होते. समितीनुसार गतिरोधक करणे, पेंट्स लावणे, ‘नो एन्ट्री’चे नियोजन करणे यांसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या कामांचा आढावा घेण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’वर शासनाकडून इंजिनिअरिंग टीम, आरटीओ, पोलिस यांना काम करण्याचे निर्देश असतात.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आढावा घेतल्यावर पोलिस प्रशासन, आरटीओ, पीडब्ल्यूडी, नाशिक महापालिका प्रशासनाला या ‘ब्लॅक स्पॉट’वर केलेल्या उपाययोजना, त्यांचे मिळालेले रिझल्ट याचा सविस्तर आढावा दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. (latest marathi news)

बैठकीला नाशिक आरटीओचे प्रादेशिक अधिकारी प्रदीप शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी विनोद जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, ‘न्हाई’तर्फे दिलीप पाटील, शशांक आडके, नाशिक महापालिकेचे रवी बागूल, ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अभियंता रंजना दळवी आदी उपस्थित होते.

‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे काय?

ज्या ठिकाणांवर उपाययोजना केल्यावरही सातत्याने अपघात होतात, तसेच अपघात झाल्यावर उपाययोजना केल्यावरही तीन वर्षांत त्या ठिकाणी अपघात होणे अथवा दहा जणांपेक्षा जास्त मृत होणे, त्या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून गणले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Latest Maharashtra News Updates: सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

Crime: मुंबई हादरली! पत्नीवर अॅसिड हल्ला, पतीचं संतापजनक कृत्य, धक्कादायक कारण समोर

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

Binny and Family : जुन्या आणि नवीन पिढीला विचार देणारा 'बिन्नी अ‍ॅण्ड फॅमिली' चित्रपट

SCROLL FOR NEXT