139 inspector in state have been promoted to Assistant Commissioner esakal
नाशिक

Nashik Police Promotion : राज्यातील 139 निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती; शहरातील चौघांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील १३९ पोलिस निरीक्षकांना अखेर सहायक पोलिस आयुक्त तथा पोलिस उपअधिक्षकपदी पदोन्नती देण्यात आली असून येत्या १८ जूननंतर या अधिकाऱ्यांकडून नियुक्तीसाठी पसंती क्रम मागविले आहेत. यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील दोन तर, एसीबीतील एक व महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एक अशा चार अधिकाऱ्यांचा या पदोन्नतीमध्ये समावेश आहे. (Nashik 139 inspector in state have been promoted to Assistant Commissioner)

एक ते दीड वर्षांपासून पोलिस दलातील निरीक्षकांना पदोन्नतीची प्रतिक्षा होती. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आधिपत्याखाली आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी १३९ पोलिस निरीक्षकांना पदोन्नत केल्याचे आदेश जारी केले.

या पदोन्नत अधिकाऱ्यांना रिक्त जागांवर सहायक आयुक्त किंवा उपअधिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी महासंचालक कार्यालयाने सर्व घटक प्रमुखांना या अधिकाऱ्यांची महसूल संवर्ग, पसंती व इतर माहिती येत्या १८ जूनपर्यंत मागविली आहे. त्यानंतर रिक्त जागेनुसार पदस्थापना होणार आहे. (latest marathi news)

यांना पदोन्नती

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पीसीबीएमओबी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष कोंडाजी पवार, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शंकर शाहू खटके, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील विश्वजीत जाधव आणि महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कुमार भिकाजी चौधरी यांची सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT