Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सिन्नर तालुक्यातून १४ जादा बसची सोय केली आहे. कोणत्याही गावातून ४५ पेक्षा अधिक जणांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी सिन्नर तालुक्यातून १४ जादा बस सोडण्यात येणार आहे. (14 extra buses from Sinnar Agar to Pandharpur for Ashadhi Ekadashi )
१३ ते २२ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे होणारी यात्रा, तसेच गुरूपौर्णिमा हा दिवस वारकरी, भाविकांसाठी महत्वाचा असतो. महामंडळाच्या बसमधून पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात येणार असून तिकीटांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. महिला व ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या योजना जादा बससेवेसाठीही लागू राहणार असल्याचे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. (latest marathi news)
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन आहे. कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३५ लाख महसूलाचे उदिष्ट्य
गतवर्षी २०२३ ला ५४ बसद्वारे १८५ फेऱ्यांतून यात्रेकरुंना सेवा देण्यात आली होती. जादा बस सेवेचा तब्बल ११ हजार २९० प्रवाशांनी लाभ घेतला होता. त्याद्वारे आगाराला २९ लाख ८८ हजार ९१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०२२ च्या तुलनेत हे उत्पन्न १५ लाखाने जास्त होते. २०२२ साली ४३ बसद्वारे ६६४६ भाविकांनी लाभ घेतला होता. त्यातून १४ लाख १४ हजार ६५१ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा गत दोन वर्षांच्या तुलनेत जास्त उत्पन्न घेण्याचा मनोदय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ३५ लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.