Wine Industry esakal
नाशिक

Nashik Wine Industry : राज्यातील 13 वाइन उद्योगाला 15 कोटींचे अनुदान मिळणार; शासनाचा निर्णय

Wine Industry : द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळून द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी, यासाठी राज्यातील १३ वाइन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचे अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Wine Industry : द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळून द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी, यासाठी राज्यातील १३ वाइन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचे अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील वाइन उद्योगांना मोठाच आधार मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. ()

ते भरून निघावे, शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे, सुकामेवा बनविणे, तसेच द्राक्षापासून आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायी पर्यायी उत्पादनांची निर्मिती व्हावी, द्राक्षावर आधारित वाइन उद्योगास प्रोत्साहन म्हणून शासनाने द्राक्षप्रक्रिया उद्योग धोरणानुसार राज्यामध्ये उत्पादित केलेल्या व अंतिमतः विक्री झालेल्या वाइनच्या विक्रीवर देय असलेल्या २० टक्के मूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी १६ टक्के कराच्या रकमेइतके वाइन प्रोत्साहन अनुदान वाइन उद्योगास देण्याची २२ मार्चला मंजुरी दिली आहे.

त्यानुसार सुमारे पंधरा कोटींचे अनुदान राज्यातील १३ वाइन उद्योगाला मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या ४ फेब्रुवारीच्या बैठकीतील निर्णयानुसार वाइन उत्पादक घटकास प्रोत्साहन योजनेंतर्गत प्रलंबित दावे निकाली काढणे व या योजनेची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार राज्यकर सहआयुक्त (व्हॅट व्यवस्थापन) नाशिक विभाग नाशिक, राज्यकर सहआयुक्त मोठे करदाते, राज्यकर सहआयुक्त पुणे, राज्यकर सहआयुक्त (व्हॅट व्यवस्थापन) सोलापूर यांच्याकडून प्रोत्साहन परताव्याबाबत प्राप्त प्रस्ताव व उद्योग संचालनालयामार्फत सादर केलेल्या अहवालानुसार २०२१, २२ आणि २३ या तीन वर्षांच्या प्राप्त प्रलंबित दाव्यांकरिता १४ कोटी ९९ लाख ४५ हजार २१५ एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे दावे संबंधित वाइनरीजकडे प्रलंबित असल्याने ते निकाली काढणे आवश्यक आहे. एकूण ५५ दावे प्रलंबित आहेत. तथापि २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता वित्त विभागामार्फत सुधारित अंदाजाच्या मर्यादेत एकूण १५ कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातून १३ वाइनरीजचे प्रलंबित दावे निकाली काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.(latest marathi news)

अनुदान मिळणारे वाइन उद्योग

१) फटेली वाइन्स प्रा. लि. सोलापूर ः १,४४,६२,७३२

२) ओकवूड वाइनरी प्रा. लि. नाशिक ः ४०,८३,८९५

३) गुद्ध ड्रॉप बाईन सेलर्स लि. नाशिक ः ९३, ५०,७५८

४) सोमंदा वाइन यार्डस् प्रा. लि. नाशिक ः १६,०९,७२०

५) सुला वाइन यार्डस् प्रा. लि. नाशिक ः ५, ८८,१०,३७५

६) निरा व्हॅली ग्रेप वाइन्स प्रा.लि. नाशिक ः ९, ७३, ०७०

७) यॉर्क वाइनरी प्रा.लि. नाशिक ः ४३, ९७,२९४

८) हिल क्रेस्ट फुड्स अॅन्ड बेवरेजेस पुणे ः ४, ५२, ८८७

९) फटेली वाइन्स प्रा. लि. सोलापूर ः ३, ७८, ९८, ९०४

१०) विनलॅन्ड वाइन्स कंपनी, नाशिक ः १, १६,२५२

११ फटेली वाइन्स प्रा.लि. सोलापूर ः १,६२,७३.३०७

१२) ग्रेप्सी वाइन्स अॅन्ड बेवरेज, पुणे ः २.४८,६२२

१३) ग्रेप सिटी वाइनरी, सांगली ः १२, ६७, ३९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT