TB  esakal
नाशिक

Nashik News: जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायती टीबीमुक्त! दिंडोरी, येवल्याचे मोठे यश, आज नाशिकला कांस्यपदक देऊन होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा

येवला : पंतप्रधानानी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट २०२५ ला पूर्ण कराण्याचे ठरविले आहे. त्यानुषंगाने जिल्हा क्षयरोग कार्यालयाने वर्षभर जिल्ह्यात टी. बी. मुक्त अभियानातून जनजागृतीसह उपाययोजना राबविल्या असून, त्याचे फलित म्हणजे तब्बल १४९ ग्रामपंचायतींची टीबीमुक्त म्हणून निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीचा सन्मान आज (ता. २९) नाशिक येथे होणार आहे. (Nashik 150 gram panchayats in district TB free)

केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा अभियान राबविण्यात येत आहे. टीबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.

या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन करून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जाहीर केली. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात आला. तसेच, जनजागृती अभियान राबविण्यात आले. यासाठी जिल्ह्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात होता.

या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षयरोगाचे निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला. यात आशा कार्यकर्त्यांनी वार्षिक १००० लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी केली. त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा कमी (निरंक) रुग्ण आढळलेल्या तसेच रुग्ण आढळला तर त्याने सहा महिन्यांचा उपचार घेतलेला असावा, डीएसटी तपासणी झालेली असावी.

त्याचे प्रमाण ६० टक्के असावे, निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला असावा अशा ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. क्षयरोगाचे दूरिकरण करण्यासाठीया टी. बी. मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार आहे.

दिंडोरी, येवला आघाडीवर

या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होत्या. मात्र, सर्वाधिक यश दिंडोरी आणि येवल्याच्या पदरात पडले आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी कार्यरत होती.येवला येथील प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक नितीन पवार आदींनी येवल्यात वर्षभर विविध उपक्रम राबवत हे यश मिळविले. (latest marathi news)

आज होणार सन्मान

नाशिक ग्रामीण अंतर्गत २०२३ मध्ये एकुण १४९ ग्रामपंचायतीची निवड टिबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून करण्यात आलेली आहे. या ग्रामपंचायतीना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रशस्तीपत्रक देवून सोमवारी ता. २९) सकाळी ११.३० वाजता शालीमार येथील महाकवी कालिदास कला मंदिरात गौरव करण्यात येणार आहे.

"२०२५ ला क्षयमुक्त भारत स्वप्न पुर्ण कराण्याचे ठरविले आहे. गाव पातळीवरील आरोग्य संस्था व उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे अधिकारी व कर्मचारी व संबंधित ग्रामपंचायतीच्या पाठिब्याने क्षयरोग दुरिकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्याने ग्रामीण भागाला क्षयरोग मुक्त करता येणे शक्य झाले आहे. पहिल्याच प्रयत्नात दीडशे ग्रामपंचायतीने या अभियानात यश मिळाल्याने नक्कीच याची शंभर टक्के उद्दिष्टपुरती होईल, असा आशावाद आहे."- सुरेश पाटेकर, गटविकास अधिकारी, येवला

● क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत

दिंडोरी - 35

येवला - 21

त्रंबकेश्वर - 11

सुरगाणा - 7

सिन्नर - 3

सटाणा - 4

पेठ - 1

निफाड - 8

नांदगाव - 8

नाशिक - 6

मालेगाव - 11

कळवण - 14

इगतपुरी -5

देवळा - 4

चांदवड - 11

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT