Naik Shikshan Sanstha Board of Directors quinquennium elections esakal
नाशिक

Nashik News : अध्यक्षपद 19, सरचिटणीसपदासाठी 22 इच्‍छुक; आज नामनिर्देशन छाननी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देश दाखल करण्याच्‍या शेवटच्‍या दिवशी मंगळवारी (ता. ९) १५२ नामनिर्देश अर्ज दाखल झाले. यातून दाखल एकूण नामनिर्देशांची संख्या ४२७ वर पोचली. संस्‍थेतील महत्त्वाच्‍या अध्यक्षपदासाठी १९ इच्‍छुकांनी २३ अर्ज दाखल केले असून. (152 nomination applications for Naik Shikshan Sanstha Board of Directors quinquennium elections)

तितक्‍याच महत्त्वाच्‍या सरचिटणीसपदासाठी २२ इच्‍छुकांनी एकूण २५ अर्ज दाखल केले. बुधवारी (ता. १०) अर्ज छाननी होईल. गुरुवार (ता. ११) ते शनिवार (ता. १३) माघारीची मुदत असेल. नामनिर्देश दाखल करण्याच्‍या अखेरच्‍या दिवशी मंगळवारी (ता. ९) माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उपाध्यक्षपद व सरचिटणीसपदासाठी देखील अर्ज भरला.

विद्यमान उपाध्यक्ष ॲड. पी. आर. गिते यांनी सरचिटणीसपदाचाही अर्ज भरला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज बुरकुले यांनीदेखील अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सरचिटणीसपदासाठी देखील नामनिर्देशन दाखल केले. विश्वस्त आणि नाशिक संचालकपदासाठी भीमराव बोडके यांनी अर्ज सादर केला.

इतरही दिग्‍गजांनी दिवसभरात संस्‍थेचे शैक्षणिक संकुल गाठताना नामनिर्देश दाखल केले. अनेकांनी आपल्‍या समर्थकांसह हजेरी लावल्‍याने संस्‍थेच्‍या कॅम्‍पसमध्ये वर्दळ बघायला मिळाली. दिवसभरात अध्यक्षपदासाठी १२, विश्वस्तपदासाठी ३४, उपाध्यक्षपदासाठी १४, सरचिटणीस १३, सहचिटणीस नऊ, महिला ११, कार्यकारिणी सदस्‍यपदासाठी नाशिक २०, दिंडोरी- पाच, निफाड- दहा, सिन्नर- आठ, नांदगाव- सात, येवला- नऊ अर्ज दाखल झाले. (latest marathi news)

माघारीपर्यंत टिकून राहणार ‘सस्‍पेन्‍स’

निवडणुकीत एकीकडे नामनिर्देश भरण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडत असताना, दुसरीकडे पॅनल उभारणीसाठीची जोडतोड सुरू असल्‍याने पडद्यामागे घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इच्‍छुकांकडून एकापेक्षा जास्‍त पदांसाठी अर्ज दाखल करताना ‘सस्‍पेन्‍स’ निर्माण केला आहे. त्‍यामुळे कुठला इच्‍छुक नेमका कोणत्‍या पदासाठी निवडणूक लढविणार, हे माघारीनंतर शनिवारी (ता. १३) स्‍पष्ट होऊ शकेल.

बिनविरोध निवडणुकीसाठी बोडके, आव्‍हाड यांचे निवेदन

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दत्तू बोडके, महेश आव्हाड यांनी निवेदन जारी केले. महाराष्ट्रातील जातीपातीचे गढूळ वातावरण, मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या आंदोलनांच्‍या पार्श्वभूमीवर वंजारी समाजाने एकत्र यावे.

समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याकरिता कसोशीने प्रयत्‍न करण्याची मागणी केली. ज्येष्ठांचा लवाद नेमत सर्व इच्छुक उमेदवारांतून सर्वसमावेशक नावे निवडावी. हा निर्णय इच्छुकांनी मान्य करून आदर्श पायंडा पाडण्याचे आवाहन केले. निवडणूक बिनविरोध होत असल्‍यास दोघांनी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शवली.

पदनिहाय दाखल एकूण अर्ज

अध्यक्ष ------ २३

उपाध्यक्ष ----- २९

सरचिटणीस --- २५

सहचिटणीस --- २७

विश्वस्त -------- ९४

कार्यकारिणी सदस्य

निफाड --------- ४९

नाशिक --------- ५०

सिन्नर --------- ३२

दिंडोरी ---------- २३

नांदगाव -------- २३

येवला ---------- २८

महिला --------- २४

मंगळवारी (ता. ९) महत्त्वाच्‍या पदांसाठी दाखल केलेले अर्ज

- अध्यक्षपदासाठी- पंढरीनाथ थोरे, मनोज मुरकुले, ॲड. पी. आर. गिते, कोंडाजीमामा आव्‍हाड, जयंत सानप, बाळासाहेब सानप, राजेंद्र सोनवणे, सुनील आव्‍हाड, प्रकाश घुगे, तानाजी जायभावे, संदीप कातकाडे, बाळासाहेब पालवे.

- सरचिटणीसपदासाठी मनोज बुरकुले, ॲड. पी. आर. गिते, कोंडाजीमामा आव्‍हाड, जयंत सानप, उदय घुगे, बाळासाहेब सानप, राजेंद्र सोनवणे, गोविंद साबळे, सुनील आव्‍हाड, संजय सांगळे, प्रकाश घुगे, विजय सानप, कमलेश बोडके.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT