Fallen tree with electric wires on house behind Heram Ganesh Mandir, Marathi School & power cut file photo esakal
नाशिक

Nashik Power Cut : मालेगावात तब्बल 18 तास बत्तीगूल! वादळामुळे झाडे, फांद्या पडल्याने वीजतारा तुटल्या

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरात झाडे, फांद्या कोसळून शहरासह लगतच्या गावात विजेच्या तारा तुटल्याने तब्बल अठरा तास बत्ती गूल होती.

शहरातील तीनशेहून अधिक घरांना त्याचा फटका बसला असून तब्बल सोळा ते अठरा तास कडक उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्यात व अंधारात काढावे लागले. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल 'स्वीच ऑफ' येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Nashik 18 hours of power cut in Malegaon)

शहरातील मालेगाव कॅम्प, जाजूवाडी, भायगाव रोड, हेरंब गणेश मंदिर, शांतिनगर, कलेक्टर पट्टा, चर्चगेट, हिंमतनगर, सटाणा नाका, सोयगाव भागांसह अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली.

विशेषतः: महिलांकडून पॉवर सप्लाय कंपनीच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. काही भागात रात्री उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते. परंतु तोपर्यंत नागरिकांना अनेक तास अंधारातच राहून प्रचंड उकाड्यात मच्छरांचा सामना करावा लागला.

कंपनीकडून अल्प प्रतिसाद

कंपनीने दोन चोवीस तास ऑनलाईन कॉल सेवा दिल्या असल्या तरी त्यावर ग्राहक नोंदणीकृत मोबाईलने ऑटो तक्रार नोंद होते. पण प्रत्यक्षात काय घडले असेल हे संबंधित कर्मचारी पोचेपर्यंत निदर्शनास येत नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तक्रार करूनही चोवीस तासांपेक्षा अधिक काळ ग्राहकांना अंधारातच काढावा लागतो.

त्यामुळे वणवण भटकंती करत कंपनीचे अधिकारी टोलवाटोलवी करून थेट सटाणा नाका भागातील अहिंसा सर्कल कार्यालयात पाठवतात. बऱ्याचदा भाषेची अडचण होत असल्याने हमरी तुमरीचे प्रकार घडतात. यावर खासगी समजल्या जाणाऱ्या पॉवर सप्लाय कंपनीबद्दल शहरवासियांची मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले असून सोमवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते

मान्सूनपूर्व कामांचा फज्जा

कंपनीतर्फे दरवर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे केली जातात. परंतु ही कामे केल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात. मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे यंदा केली गेली की नाही? या नावाने टेंडरही काढले.

पण कामेच झाली नसतील तर टेंडरही कुचकामी ठरत असल्याचे कालच्या प्रकारावरून दिसून आले. मान्सूनपूर्व मेंटेनन्स कामांची वरिष्ठ अभियंत्यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयश येत असले तरी थकीत वीजबिल वसुलीसाठी मात्र शंभर टक्के जोर लावण्यात येतो अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

काय म्हणतात नागरिक?

▪ स्वतंत्र हेल्पलाईनची गरज.

▪ आपत्कालीन सुविधा फक्त नावालाच, प्रत्यक्ष कृतीची गरज.

▪ चोवीस तास कॉल सेंटर व तक्रारी लेखी नोंद घ्यावी.

▪ पॉवर सप्लाय कंपनीने मनुष्यबळ वाढवावे

▪ प्री मान्सून ट्री कटींग दरवर्षी व वेळोवेळी करण्यात यावी.

"कंपनीच्या कॉल सेंटरवर ऑटोमोडने तक्रार नोंदवली जाते. मात्र चोवीस तासात ती सोडवली जात नाही. परिणामी एखाद्या रहिवासी वस्तीत वायर तुटली असेल तर अनेक जिवितांना धोका होतो. पावसाळ्यापूर्वी देखभालीचे काम कंपनीने का केले नाही?"

- सुनील अहिरे, सटाणा नाका, सोयगाव

"वादळात झाडे तुटल्याने मुख्य केबलचा स्फोट झाला. नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतली नसती तर अनर्थ घडला असता. वीज कंपनी वसुलीसाठी तानाशाहीचा वापर करते, तशा सुविधा पुरविण्यासाठी सक्षम असावे."- सौरभ मुसळे, युवा कार्यकर्ते, मालेगाव कॅम्प

"शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. अनेक टीम यासाठी कार्यरत आहेत. लवकरच काम पूर्णत्वास जाईल."- प्रणय पवार, कनिष्ठ अभियंता, पॉवर सप्लाय कंपनी, मालेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT