Nashik News : सातपूर येथील शिवाजीनगरमधील बांधकाम साइटच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजीनगर कार्बन नाकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खासगी साइटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. (2 children die after swimming in construction site pit in satpur )
या खड्ड्यात मुसळधार पावसाने मोठ्या स्वरूपात पाणी साचले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास १२ ते १५ वर्ष वयाची चार ते पाच मुले खड्ड्यात पोहण्यासाठी गेली होती. सातपूरच्या श्रमिकनगरमधील अंकुश किरण गाडे (वय १५) व प्रणव विनोद सोनटक्के (वय १५) हे दोघेही बालशिक्षण मंदिर जनता विद्यालयातील नववीत शिकणारे वर्गमित्र साडेपाचला शाळेतून आल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेले होते. त्या वेळी त्या खड्ड्यात चार ते पाच जण पोहत होते.
हे दोघेही पोहण्यासाठी खड्ड्यात उतरले असता, त्यांचे पाय चिखलात अडकल्याने ते बुडाले. सोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा केला, तसेच घरी जाऊन घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. सायंकाळी सातच्या सुमारास सातपूर अग्निशमन दलास समजले अस,ता त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलाचा शोधण्याचा प्रयत्न केला. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, रवींद्र धिवरे यांनी जीवरक्षक संदीप गुंबाडे व इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.