Nashik News : नामपूर बाजार समितीचे संचालक पंकज साहेबराव भामरे, युवराज दौलत पवार हे दोघेही प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती नसल्याने जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी त्यांना अपात्र ठरविले. याबाबत गणपत तुकाराम पवार यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारींवर सुनावणी होऊन ही कारवाई झाली. विद्यमान संचालक अपात्र ठरल्याने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. (Nashik 2 directors of Nampur market Committee disqualified)
नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ ऑक्टोबर २०२३ ला मतदान झाले. यात, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य सभापती यतींद्र पगार, ज्येष्ठ नेते प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक १३ जागा जिंकत बाजी मारली होती. प्रतिस्पर्धी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांच्या बळीराजा पॅनलला केवळ एक जागा मिळाली.
भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. शेतकरी विकास पॅनलमधील सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झालेले पंकज भामरे आणि युवराज पवार यांच्याविरोधात गणपत पवार यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही अर्जात खोटी व दिशाभूल माहिती सादर करत शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केली व निवडून आल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे जानेवारी २०२४ मध्ये केली होती. (latest marathi news)
या तक्रारींच्या अनुषगांने कार्यालयाने १२ व २८ फेब्रुवारी, १ व १९ मार्चला लेखी-तोंडी म्हणणे मांडत सुनावणी घेतली. तक्रारदारांतर्फे अॅड. स्वप्ना राऊत यांनी, तर संचालकांतर्फे अॅड. एस. जी. सोनवणे यांनी बाजू मांडली. यात पंकज भामरे व युवराज पवार दोघेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम १० (१) (ग) चे उल्लंघन केले आहे.
तसेच उत्पन्नाचे मुख्य स्रोत शेती असल्याबाबतचा सक्षम पुरावा दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक मुलाणी यांनी भामरे व पवार यांना अपात्र ठरविल्याचा निर्णय दिला. याबाबतचे आदेशदेखील काढण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.