Letters and other belongings from collapsed houses on Kazigadhi bank. esakal
नाशिक

Nashik News : काझीगढीची माती ढासळल्याने 2 घरे कोसळली; दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रश्न ऐरणीवर

Nashik : काझीगढीची काठावरील माती ढासळल्याने दोन घरे कोसळून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काझीगढीची काठावरील माती ढासळल्याने दोन घरे कोसळून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. रहिवासी मात्र भीतीच्या सावटात आहेत. तर दोन कुटुंबीय घडलेल्या घटनेनंतर अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले. दरवर्षीच्या पावसाळ्यात काझीगढीचा प्रश्न ऐरणीवर येतो. प्रत्यक्षात मात्र कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे पावसाळा आला की काझीगढी वासियांमध्ये भीतीचे सावट असते. रात्र वैऱ्याची असे अनुभवत जागून रात्र काढावी लागते. ()

रविवार (ता.४) रात्री असाच काहीसा अनुभव येथील रहिवाशांना विशेष करून राधाबाई रणशिंगे आणि गायत्री तारू यांना आला. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाने रणशिंगे आणि तारू कुटुंबीयांच्या घरास लागून असलेल्या गढीच्या काठावरील माती पाण्याने ढासळली. त्यामुळे घराचा भाग अधांतरी होऊन अचानक कोसळला. दोन्ही कुटुंबीय कोसळलेल्या घरांच्या पुढील भागात असल्याने दुर्घटना टळली.

रणशिंगे कुटुंबीयांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य खोलवर पडून नुकसान झाले. रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तारू कुटुंबीयांचे घर कोसळल्याने सुभद्रा कुमावत यांच्या घराच्या भिंतीसही तडा जाऊन त्यांचे घरही अधांतरी झाले आहे. कुठल्याही क्षणी ते घरही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुमावत कुटुंबीय इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.

अशाच प्रकारे काठावरील अन्य बहुतांशी घरे धोकादायक अवस्थेत आहेत. दरवर्षी अशा घटना घडूनही जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. केवळ नोटीस देण्याचा सोपस्कार आणि घटना घडल्यानंतर आमदार, मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून भेट देण्याची तसदी घेतली जाते. अशा खोचक शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. (latest marathi news)

पीडित जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला

रणशिंगे कुटुंबीय तसेच अन्य काही रहिवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली. तर अन्य रहिवाशांनी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघू नये. काझीगढी संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली.

पश्चिम विभाग कर्मचाऱ्यांकडून भेट

काझीगढीवरील दोन घरे कोसळल्याची माहिती मिळताच पश्चिम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती घेत पंचनामा केला. अन्य रहिवाशांना स्वतःची काळजी घेत इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावे. अशी विनंती केली. गढीच्या इतर भागाचीही पाहणी करत वरिष्ठांना माहिती दिली.

''भीतीच्या सावटात वास्तव्य करावे लागत आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. हातावरील असल्याने अन्य ठिकाणी जाऊ शकत नाही. ग्रामीण भागात अशा रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. शहरात तसे नाही. याची खंत वाटते.''- सुभद्रा कुमावत, रहिवासी

''कोसळलेले घर आजीचे आहे. काठावर घर असल्याने पुढील भागात सर्वजण स्थलांतरित झाले होते. घर पडण्याचा आवाज आल्याने भीती निर्माण झाली. धोकादायक भागापासून दूर पळालो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.''- अक्षदा पारटे, रहिवासी (मुलगी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Traffic Update: पुणे सातारा महामार्गावर अदभुतपुर्व वाहतुक कोंडी; 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

सायराशी लग्नानंतर ए आर रहमानच्या कुटुंबाने केलेली अ‍ॅडजस्टमेन्ट; पत्नीमध्ये आणि आईमध्ये सगळं आलबेल नव्हतं, गायकाने सांगितलेलं सत्य

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT