Students who are coming out of the 12th exam with English paper. esakal
नाशिक

HSC Exam 2024 : इंग्रजीच्या पेपरला धुळ्यात 2 कॉपीबहाद्दर; विद्यार्थ्यांचा बळावला आत्‍मविश्‍वास

HSC Exam : इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षेला बुधवार (ता.२१) पासून सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

HSC Exam 2024 : इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षेला बुधवार (ता.२१) पासून सुरवात झाली. पहिल्‍याच दिवशी इंग्रजी विषयाची परीक्षा बहुतांश विद्यार्थ्यांना सोपी गेल्‍याने आत्‍मविश्‍वास बळावल्‍याची प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात आली. दरम्‍यान धुळे जिल्ह्यात आढळलेल्‍या दोन कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. ( nashik HSC exam marathi news )

फेब्रुवारी -मार्चमध्ये बारावीच्‍या लेखी परीक्षा पार पडत असून, निर्धारित वेळापत्रकानुसार बुधवारपासून लेखी परीक्षेला सुरवात करण्यात आली. पहिल्‍या टप्‍यात भाषा विषयांच्‍या परीक्षा होत असून, इंग्रजी विषयासाठी नाशिक जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार अशा नाशिक विभागातून एक लाख ६७ हजार ४८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

प्रशासकीय पातळीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्‍या स्‍तरावर भरारी पथके तैनात केलेली होती. त्‍यानुसार या पथकांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देताना पाहणी केली. यामध्ये धुळे जिल्ह्यात कॉपी करताना आढळलेल्‍या दोघा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागात उर्वरित कुठेही गैरप्रकार आढळला नसल्‍याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

देवळाली कॅम्‍प येथील एसव्‍हीकेटी महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर मंडळ सदस्‍य आमदार विक्रम काळे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे उपस्‍थित होते.

दरम्‍यान, बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर सोपा गेल्‍याची प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. सुरवात चांगली झाल्‍याने पुढील परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आत्‍मविश्‍वास वाढला असल्‍याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तसेच वाढीव दहा मिनिटांचा फायदा होत असून, यामुळे जास्‍तीत जास्‍त उत्तरे लिहिण्यास प्रोत्‍साहन मिळत असल्‍याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. इंग्रजी विषयाच्‍या पेपरमध्ये व्‍याकरणासंदर्भातील प्रश्‍नांची काठीण्यपातळी अधिक राहिल्‍याची प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली.

पालकांनी मांडले ठाण

बहुतांश विद्यार्थ्यांसोबत त्‍यांचे पालकदेखील परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. यामध्ये बऱ्याच पालकांनी परीक्षा कालावधीत केंद्राच्‍या आवारात ठाण मांडला होता. दिवसा उन्‍हाचे चटके जाणवत असल्‍याने सावलीचा शोध घेत पालकांनी काही वेळ विश्रांती घेतली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT