JEE Advance esakal
नाशिक

JEE Advance Exam : जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला 2 हजार विद्यार्थी प्रविष्ट

Nashik News : इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा घेतली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा घेतली जात आहे. रविवारी (ता. २६) होणाऱ्या परीक्षेला नाशिकमधील सात केंद्रांवर सुमारे दोन हजार विद्यार्थी सामोरे जातील. यापूर्वी घेण्यात आलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेच्‍या आधारे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता निश्‍चित करण्यात आली होती. (2 thousand students appeared for JEE Advanced exam)

पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्जही मागविण्यात आले होते. त्‍यानुसार अर्ज दाखल करून निर्धारित शुल्‍क भरलेल्‍या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला सामोरे जाण्याची संधी उपलब्‍ध होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर होत असलेली ही परीक्षा नाशिकमध्ये सात केंद्रांवर होईल.

विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची माहिती व इतर तपशील उपलब्‍ध करून दिला आहे. वेबइजी इन्‍फोटेक एज्‍युकेशन, लेट जी. एन. सपकाळ इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक टेस्टिंग एजन्‍सी, नाशिक वेब सोल्‍यूशन्‍स (एनआयटी), एमईटी भुजबळ नॉलेज सिटी, फ्यूचरटेक सोल्‍यूशन्‍स, ॲपेक्‍स एक्झामिनेशन सेंटर या केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

दोन पेपरचे आयोजन...

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेअंतर्गत दोन पेपरला विद्यार्थी सामोरे जातील. वेळ अत्‍यंत मोजकाच असल्‍याने विद्यार्थ्यांना अतिशय चपळतेने निर्धारित वेळेत सर्व प्रश्‍न सोडवायचे आहेत. (latest marathi news)

दरम्‍यान, रविवारी (ता. २६) सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पेपर क्रमांक एक पार पडणार आहे. दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत पेपर क्रमांक दोन पार पडणार आहे. नाशिकमधून सुमारे दोन हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातील.

"विद्यार्थी सुमारे दोन वर्षे या परीक्षेची सचोटीने तयारी करत असतात. यापूर्वी जेईई मेन्‍स परीक्षेतून आत्‍मविश्‍वास वाढलेला असल्‍याने जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला सामोरे जाताना त्‍याची मदत होते. अधिकाधिक विद्यार्थी नाशिकमधून, आमच्‍या क्‍लासमधून आयआयटीसाठी निवडले जातील, असा विश्‍वास आहे." - कपिल जैन, संचालक, स्‍पेक्‍ट्रम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT