Nashik Commissioner of Police ankush shinde  esakal
नाशिक

Nashik @2030 : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज पोलिसिंग | अंकुश शिंदे

सकाळ वृत्तसेवा

दिवसेंदिवस शहराचे आकारमान वाढत आहे. पर्यटन, तीर्थस्थान, उद्योग, शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी-सुविधांमुळे झपाट्याने विकासाच्या मार्गाने धावणाऱ्या शहरात नाशिकचा समावेश होतो. यामुळे २०३० पर्यंत नाशिकचा चेहरामोहरा बदललेला असेल, यात दुमत नाही. (nashik@ 2030 Policing equipped with latest technology sakal anniversary special article)

परंतु, वाढत्या शहरीकरणातून गुन्हेगारीत वाढ होण्याचाही धोका तितकाच आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस दलातही आमूलाग्र बदल होत आहे.

"अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये पोलिसांनाही तरबेज व्हावे लागेल. एकूणच काय, तर एकीकडे गुन्हेगारीला आळा घालत असताना दुसरीकडे समाजातील सलोखा टिकवून ठेवण्यासाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या दोन पातळ्यांवर पोलिसांना काम करावे लागणार असून, हे मोठे आव्हान पोलिस दलासमोर असणार आहे." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

वाढती लोकसंख्या आणि गरजा पाहता शहराचे आकारमान वाढत जाणार आहे. चहूबाजूने पसरणारे शहर आता उंच-उंच इमारतींमुळे व्हर्टिकलही होत आहे. वाढत्या शहरीकरणाचा थेट परिणाम वाहतुकीवर होतो. शहरातील रस्ते तेच राहतात. फार तर रिंग रोड‌ तयार होतील.

त्या तुलनेत शहरात वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस भरमसाट वाढत आहे. अशावेळी ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट’ ही समस्या येत्या काळात गंभीर स्वरूपाची होऊ शकते. त्यात नाशिक शहरात वाहन पार्किंगची समस्या गंभीर आहे. त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट करीत असताना शहर पोलिस वाहतूक शाखेला तारेवरची कसरत करावी लागते.

हे करीत असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. नागरिकांनीही गरजेपुरतीच चारचाकी वाहने रस्त्यावर आणली पाहिजेत. अन्यथा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास रस्त्यावरील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सोडविता येऊ शकेल. त्यासाठी समाजात वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती वा प्रबोधनात्मक उपक्रम राबवून वाहनचालक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल.

‘सायबर गुन्हेगारी’ ही येत्या काळातील पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. चोरी, घरफोड्या, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची जी मोड्स असते, ते पोलिसांना ज्ञात असते. सायबर गुन्हेगारी ही त्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीची आहे. सायबर गुन्हेगारीत गुन्ह्याचा ‘एकच एक’ असा पॅटर्न नसतो. अदृश्‍य स्वरूपात असणारा सायबर गुन्हेगार आर्थिक गंडा घालताना नवनवीन क्लृप्त्या वापरत असतो.

ही समस्या नाशिक वा भारतपुरतीच मर्यादित आहे, असे नाही, तर ती जागतिक स्वरूपाची समस्या आहे. ऑनलाइन फ्रॉड, मोबाईल हॅकिंग, डार्कवेब, हॅकर्स, नायजेरियन, फिशिंग, प्रलोभन यांसारख्या अनेक प्रकारे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली जाते. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना ‘एक्स्पर्ट’ व्हावे लागणार आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असणार आहे.

नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीसंदर्भात जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालये, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून स्मार्ट फोन, इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या प्रत्येकाला सायबर साक्षर करावे लागेल. शाळा -महाविद्यालयांमध्ये सायबर बूथ करण्यात येऊन त्या माध्यमातून पोलिस विद्यार्थ्यांची जनजागृती करतील आणि हेच विद्यार्थी समाजाची सायबरसंदर्भातील जनजागृती व प्रबोधन करतील. यामुळे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजाला सोबत घेऊन सायबर गुन्हेगारी रोखता येणे शक्य होणार आहे.

सोशल मीडियाचे आव्हान

कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षणपद्धती रुढ झाली. त्यामुळे लहानग्याच्या हातात स्मार्ट फोन आला. स्मार्ट फोन हाती आल्याने शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाई सोशल मीडियाच्या विळख्यात सापडली आहे. ऑनलाइन जॉब कल्चर आल्याने तासन् ‌तास अनेकांचा कुटुंबीयांशी संवाद तुटला.

यामुळे व्यक्ती एकलकोंडा होण्याच्या दिशेने जात आहे. त्याचा विपरित परिणाम मानसिकतेवर होऊन सहनशीलतेचा अभाव तरुणाईमध्ये आला आहे. यामुळे क्षुल्लक कारणातून अल्पवयीन मुले, तरुणवर्ग, बेरोजगार, कामाचा अतिरिक्त ताण, कौटुंबिक कारणातून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तरुणाईला समुपदेशनाची गरज आहे.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश काही सेकंदामध्ये व्हायरल होतात. ही येत्या काळातील गंभीर समस्या असणार आहे. सोशल मीडियामुळे जगभरातील घडामोडी क्षणात व्हायरल होतात. प्रक्षोभक संदेश असेल, तर त्याचे पडसाद जगभर उमटतात. त्यातून समाजविघातक घटना घडण्याचा धोका वाढतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी भविष्यात कठोर स्वरूपाच्या तरतुदींची गरज आहे.

बालगुन्हेगारीची समस्या

पोलिसांसमोर अलीकडच्या काळात बालगुन्हेगारी ही समस्या उभी राहिली आहे. बेरोजगारीमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. चोऱ्यामाऱ्या, लूटमार, घरफोड्या, चैनस्नॅचिंग यांसारख्या घटनांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून बालगुन्हेगारांचा वापर केला जातो. पालकांचे आपल्या मुलांकडे लक्ष नसल्याने वा त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने बालवयातच मुले गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहेत.

विशेषत: १८ वर्षांखालील मुलांना आपण ‘अल्पवयीन’ असल्याने गंभीर गुन्हा करून गंभीर स्वरुपाची शिक्षा होत नसल्याचे माहिती असते. त्यातून ते सरावले जात पुढे तेच गंभीर गुन्हेगार होण्याची शक्यता असते. काळानुरूप कायद्यांमध्ये दुरुस्ती होत असते, त्यानुसार येत्या काळात अल्पवयीन वयासंदर्भातही बदल होण्याची चिन्हे आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हवी साथ

गुन्हेगारीमध्ये अशिक्षितापासून ते उच्च शिक्षितापर्यंतचे गुन्हेगार असतात. या गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनाही त्या दृष्टिकोनातून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. एव्हाना त्यासंदर्भात पावले टाकली जात आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिस गुन्हेगारांना शोधण्यात यश मिळवत आहेत.

त्याहीपुढे जाऊन गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान असणार आहे. त्याचप्रमाणे, शहर वाढत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळही वाढवावे लागणार आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाचा विस्तार येत्या काळात गरजेचा ठरणार आहे. विस्तार झाला, तर पोलिस ठाण्यांचीही संख्या वाढेल. मनुष्यबळ वाढेल. वरिष्ठ अधिकारी वाढतील. जबाबदारी वाढेल आणि पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञात आत्मसात करण्याचे आव्हान असेल. जे पोलिस दल यशस्वीरीत्या पेलण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT